Mohanrao Date Dainik Gomantak
गोवा

Ponda News : आकाशातील सूर्य, चंद्र हे पंचांगाचे आधारस्तंभ : मोहनराव दाते

बांदोड्यात पंचांग मार्गदर्शन कार्यशाळा सुरू, प्रशिक्षणार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गोमन्तक डिजिटल टीम

पंचांग हा आकाशाचा आरसा असून सूर्य आणि चंद्र हे पंचांगाचे आधारस्तंभ आहेत. गणित शास्त्राच्या आधारावरच पंचांग तयार केले जाते आणि हे गणितशास्त्र वेदकालापासून सुरू असल्याचे सोलापूर महाराष्ट्रातील दाते पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी सांगितले.

नागेशी - बांदोडा येथे भारतीय पंचांग मार्गदर्शन कार्यशाळा आज (गुरुवारी) सुरू झाली. या कार्यशाळेच्या उद्‍घाटन कार्यक्रमाला वेदशास्त्रसंपन्न देवदत्त पाटील, अपर्णा पाटील, कीर्तनकार सुहास वझेबुवा तसेच नागेश संस्थानचे अध्यक्ष दामोदर भाटकर व प्रशांत केरकर उपस्थित होते.

ही कार्यशाळा नागेश संस्थानतर्फे आयोजित करण्यात आली असून ती येत्या शनिवारी २९ तारखेपर्यंत चालणार आहे.

मोहनराव दाते यांच्याकडून या कार्यशाळेत सहभागींना मार्गदर्शन करण्यात येत असून प्रशिक्षणार्थींचा या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. समई प्रज्वलनाने या कार्यशाळेला प्रारंभ झाला.

देवदत्त पाटील म्हणाले की, कुठलेही देवकृत्य करताना भाविकांची आधी श्रद्धा असायला हवी. पंचांग हे मानवी जीवनाचे मार्गदर्शक असून दाते पंचांगातून उपयुक्त माहिती देण्यात येत असल्याने जीवनाच्या वाटचालीसाठी ते उपयुक्त ठरले आहे.

पंचांग मार्गदर्शन हा लोकप्रबोधनाचा एक चांगला उपक्रम असून नागेश महारूद्र संस्थानने पुढाकार घेऊन असा चांगला उपक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनी देवस्थान समितीचे अभिनंदन केले.

सुहास वझेबुवा म्हणाले की, देवकृत्यातून एक चांगला विचार भाविकांपर्यंत पोचला पाहिजे. मूळात पंचांगांबद्दलची माहिती ही सर्व समाजापर्यंत पोचली पाहिजे, त्यामुळे हिंदू धर्म अधिकच बळकट होण्यास मदत मिळेल.

अपर्णा पाटील यांनीही आपले विचार व्यक्त केले. स्वागत दामोदर भाटकर यांनी केले, तर सूत्रसंचालन मुग्धा जोशी यांनी केले.

जिज्ञासू व्हा’

मोहनराव दाते म्हणाले की, शंभर वर्षांपूर्वीपासून दाते पंचांग प्रसिद्ध होत आहे. लोकांना समजेल आणि उमजेल अशा भाषेत हे पंचांग प्रसिद्ध केले जात असून उपयुक्त माहिती या पंचांगात दिली जाते. कार्यशाळेला लाभलेला प्रतिसाद पाहून त्यांनी समाधान व्यक्त करून जिज्ञासू व्हा, असा सल्ला दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cutbona Fishing Jetty: कुटबण जेट्टीवर पुन्हा कॉलराचा उद्रेक; 6 रुग्ण आढळले, एकाची प्रकृती गंभीर

200 रुपयांवरून वाद, स्कुटर परत करायला आलेल्या जोडप्याला शिवीगाळ, सोन्याच्या कड्याने हल्ला; नेमकं प्रकरण काय?

Shivaji Maharaj Navy: ..गोवा पार केला, पोर्तुगीजांना ‘हर हर महादेवने जाग आली; शिवाजी महाराजांची एकमेव नौदल मोहीम

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचे 15 दिवसांचे अधिवेशन; कोणती विधेयके मंजूर? वाचा सविस्तर आढावा

Shravan In Goa: गूळ-खोबऱ्याच्या पातोळ्या, तोणियाची भाजी, ब्राह्मीची चटणी; श्रावणातला आहार

SCROLL FOR NEXT