Shruti Prabhugaonkar Goa Cash For Job Dainik Gomantak
गोवा

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

Cash For Job Scam Ponda Sessions Court: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गोमंतकीयांना गंडा घालणाऱ्या श्रुती प्रभुगावकरला फोंडा जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.

Manish Jadhav

Goa Cash For Job Scam Accused Shruti Prabhugaonkar Bail Granted

फोंडा: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गोमंतकीयांना गंडा घालणाऱ्या श्रुती प्रभुगावकरला फोंडा जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. पोलिसांनी शुक्रवारी (22 नोव्हेंबर) कस्टडी मागण्यासाठी श्रुतीला न्यायालयात हजर केले होते. श्रुतीच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, राज्यात गेल्या महिन्याभरापासून कॅश फॉर जॉब (Cash For Job Scam) प्रकरण गाजत आहे. या प्रकरणात श्रुती प्रभुगावकर मुख्य सूत्रधार असून तिला सुरुवातीला पोलिस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र शुक्रवारी फोंडा जिल्हा सत्र न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला.

सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयित श्रुती प्रभुगावकरला फोंडा (Ponda) पोलिसांनी अटक केली होती. श्रुतीला अटक करण्यापूर्वी पोलिसांनी तिच्या नावे लुकआउट नोटीस देखील जारी केली होती.

श्रुतीचे राजकीय कनेक्शन

कॅश फॉर जॉब प्रकरणात अटक झालेल्या श्रुती प्रभुगावकर (Shruti Prabhugaokar) हिचे भारतीय जनता पक्षासोबत कनेक्शन आढळून आले होते. श्रुती प्रभुगावकर ही गोव्यातील भाजपच्या (BJP) युवा मोर्चाची माजी पदाधिकारी असून तिचे एका बेड्या मंत्र्याच्या 'पीए'सोबत कनेक्शन असल्याची देखील माहिती मिळाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT