Rohan Naik giving information about unemployment Gomantak Digital Team
गोवा

Ponda News : स्थानिक युवकांना नोकरीत मिळावे प्राधान्य!

उसगाव ग्रामसभा : ‘आरजी’तर्फे महत्त्वाच्या ठरावांची मांडणी

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा : उसगाव पंचायत सभागृहात रविवारी (ता. २८) आयोजित केलेल्या ग्रामसभेला ग्रामस्थांचा अगदी अल्प प्रतिसाद लाभला. फोंडा गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी रिव्होल्युशनरी गोवन्सच्या रोहन नाईक व नीलेश गावडे या दोन युवकांनी ग्रामसभेत महत्त्वपूर्ण ठराव मांडले.

उसगाव पंचायत क्षेत्रातील सर्व औद्योगिक आस्थापनांमध्ये उसगावातील स्थानिक युवकांना नोकरीत समावून घेत नसल्याने या पंचायत क्षेत्रात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. संपूर्ण गोव्यातून उसगाव भागातील नेस्ले तसेच एमआरएफ कंपनीत लोक कामाला येतात; पण उसगाव येथील ग्रामस्थांना या कंपनीत रोजगार का मिळत नाही, याची दखल पंचायतीने घ्यावी व त्यांना उसगाववासीयांना नोकरीत प्रथम प्राधान्य देण्याची सक्तीची अट घालावी.

ही अट मान्य न करणाऱ्या औद्योगिक आस्थापनांचे दाखले, प्रमाणपत्रे रोखून ठेवावीत. गावातील सर्व औद्योगिक आस्थापनांकडून करवसुली महिन्याभरात करून घ्यावी. उसगाव पंचायत क्षेत्रातील औद्योगिक आस्थापनांच्या सामाजिक कल्याण फंडातून उसगावातील विविध प्रकारची सार्वजनिक विकासकामे करून घ्यावीत, असे रोहन नाईक यांनी सांगितले.

उसगाव पंचायत क्षेत्रातील सर्व भाडेकरूंचे वर्षातील पहिल्या महिन्याचे भाडेशुल्क घरमालकाला पंचायत कार्यालयात भरणा करावे लागणार आहे. यासाठी सर्वेक्षण करण्यासाठी पंचायतीतर्फे एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात येणार आहे. पंचायत क्षेत्रातील विक्रेत्यांकडून सोपो गोळा करण्यासाठी लवकरच निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

- नरेंद्र गावकर, सरपंच, उसगाव

उसगाव भागातील सर्व युवक-युवतीनी एकत्र येऊन या भागातील आस्थापनांत नोकरी मिळविण्यासाठी पंचायतीमध्ये होणाऱ्या ग्रामसभेत उपस्थिती लावावी व पंचायतीवर दबाव आणावा. तसे केल्यास या भागातील आस्थापनांत तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.

- रोहन नाईक, ‘आरजी’चे कार्यकर्ते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ZIM: हरारेमध्ये श्रेयस अय्यरचा ऐतिहासिक पराक्रम! एमएस धोनीचा 14 वर्षे जुना रेकॉर्ड मोडीत; मैदानावर केला मोठा कारनामा

Pakistan Economic Crisis: पाकड्यांचा कॅनडाच्या तिजोरीवर डोळा! मिळाली 453 कोटींची मोठी 'भीख'; शाहबाज सरकारने भारताविरोधात ओकली गरळ

Alia Bhatt on Student Protest: 'विद्यार्थ्यांच्या धैर्याला, चिकाटीला सलाम...', आलिया भट्टचा CJP च्या आंदोलनाला उघड पाठिंबा Post Viral

VIDEO: माटणे-दोडामार्ग अपघातात मयेतील दुचाकीस्वार ठार

WTC 2027 Final: ICC ची मोठी घोषणा! 9 ते 13 जूनदरम्यान 'द ओव्हल'वर रंगणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना

SCROLL FOR NEXT