Ponda Police Station Dainik Gomantak
गोवा

Ponda: दुचाकी चोरीप्रकरणी तिघे अल्पवयीन ताब्यात; फोंडा पोलिसांची कारवाई

गुप्त माहिती व स्थानिक युवकांच्या मदतीने पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.

Rajat Sawant

Ponda Police Detain Three Minors For Theft: मडकई व खांडेपार येथे दोन दुचाकी चोरी प्रकरणी स्थानिक युवकांच्या मदतीने फोंडा पोलिसांनी 3 अल्पवयीन विद्यार्थ्यांना शनिवारी रात्री ताब्यात घेतले. या प्रकरणातील अन्य दोघांच्या शोधात पोलिस आहेत.

फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओपा खांडेपार येथे ओपन पार्किंगमधून एक दुचाकी चोरी झाली होती. अशाच प्रकारे मडकई येथेही दुचाकीची चोरी करण्यात आली होती. याबाबतची तक्रार फोंडा पोलिसांत दाखल करण्यात आली होती.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला. यावेळी गुप्त माहिती व स्थानिक युवकांच्या मदतीने पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांना दुचाकी चोरी प्रकरणी ताब्यात घेतले. तसेच या प्रकरणात अन्य दोघेजण असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिस त्या दोघांच्या शोधात आहेत.

तिघेही अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी अपना घर मध्ये करण्यात आली असून फोंडा पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vehicle Theft Case: मायणा कुडतरी पोलिसांची मोठी कारवाई, वाहन चोरीप्रकरणी दोघांना ठोकल्या बेड्या; 5 दुचाकीही जप्त

ऑफिसरसाहेब गोत्यात! नवरा रुममध्ये गर्लफ्रेंडसोबत असताना अचानक बायकोची एन्ट्री, रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा Watch Video

पाकिस्तानात हिंदू मुलीचं अपहरण, जबरदस्तीनं धर्मांतर करुन मुस्लिम वृद्धाशी लावलं लग्न; कोर्टानं दिला 'हा' निर्णय

Viral Video: सायकलचं चाक लावून बाईकला जोडला पलंग, पठ्ठ्यानं झोपून चालवली गाडी; बिहारी तरुणाचा जुगाड तूफान व्हायरल

Viral Post: 'ब्रेकअप झालंय, कामात मन लागत नाही!' सुट्टीसाठी कर्मचाऱ्यानं केलेला मेल व्हायरल, पठ्ठ्याला मिळाली 10 दिवसांची सुट्टी

SCROLL FOR NEXT