Ponda Police arrested accused Dainik Gomantak
गोवा

Ponda Crime News : 43 किलो तांब्याच्या साहित्याची चोरी करणाऱ्या तीघांना अटक; फोंडा पोलिसांची कारवाई

संशयितांना पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

बोणबाग-बेतोडा येथे 43 किलो वजनाच्या तांब्याच्या साहित्याची चोरी करणाऱ्या तीन संशयितांना गजाआड करण्यात फोंडा पोलिसांना यश आले. तसेच गुन्ह्यात वापरलेली कारही पोलिसांनी जप्त केली आहे.

दरम्यान, संशयितांना फोंड्याच्या प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बोणबाग-बेतोडा येथे 43 किलो वजनाच्या तांब्याच्या साहित्याची चोरी केलेल्या तीन संशयितांना पाच दिवसांचा रिमांड देण्यात आला. शुक्रवारी 21 जुलैला ही चोरी करण्यात आली होती.

फोंडा पोलिसांनी या प्रकरणी फैजल सिकंदर शेख (रुमडामळ-दवर्ली), अनिल विश्वकर्मा (बोर्डा-मडगाव) व इस्माईल शेख (दवर्ली-मडगाव) या तिघांना अटक केली आहे. या चोरीसाठी वापरलेली जीए 01 आर 9070 या क्रमांकाची कारही पोलिसांनी जप्त केली आहे.

संशयितांना फोंड्याच्या प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिस उपनिरीक्षक आदित्य वेळीप, हेडकॉन्स्टेबल केदारनाथ जल्मी, कॉन्स्टेबल अमय गोसावी, आदित्य नाईक तसेच दत्ता नार्वेकर यांनी पोलिस निरिक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या चोरीचा तपास केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT