Goa Crime
Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : फोंड्यातील एटीएम लुटीचा पर्दाफाश; दोघे अटकेत

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime : फोंड्याजवळच असलेल्या उसगाव तिस्क परिसरातून दोन एटीएम लूट प्रकरणाचा अखेर फोंडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एटीएम लूटल्याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून यात जहांगीर इस्लाम (वय 32) आणि शेख नादीम खान (वय 52) या मूळच्या बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. पोलिस याच प्रकरणात आणखी चार आरोपींच्या शोधात असून त्यांनाही अटक करण्यासाठी फोंडा पोलिसांनी कंबर कसली आहे.

तिस्क - उसगाव येथे 18 ऑगस्ट रोजी चोरी झाली होती. यात चोरट्यांनी एचडीएफसी आणि कॅनरा बँक अशा दोन बँकांची एटीएम रात्री पळवली. चोरट्यांनी जवळच असलेल्या कुळण येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या निर्मनुष्य ठिकाणी ही एटीएम फोडली.

या एटीएम 13.37 लाख रुपये लुटल्याचा प्रकार समोर आला होता. पोलिसांनी ही दोन्ही मशीन ताब्यात घेतली असून त्याच्यावरुन हाताचे ठसे किंवा अन्य काही पुरावे मिळतात का याचा शोध पोलीस घेत होते. या चोरीतील 2 चोरटे आता पोलीसांच्या हाती लागले आहेत. तर अद्याप 4 हाती लागलेले नाहीत.

फोंडा पोलीस एटीएम लुटीच्या घटनेपासून कारसह चोरट्यांच्या मागावर होते. आता या गुन्ह्यासाठी वापरलेली ओमनी कार फातोर्डा मडगाव परिसरात पार्क केलेल्या अवस्थेत आढळली होती. GA09 A0324 असा नंबर कारवर लिहिलेला असून पेट्रोलिंग करताना फातोर्डा पोलिसांच्या पथकातील रॉबर्ट यांना ही कार आढळून आली. लागलीच त्यांनी याची माहिती फातोर्डा पोलीस स्टेशनला दिली. फोंडा पोलिसांशी संपर्क साधून त्यांना याठिकाणी पाचारण करण्यात आलं. आता अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली जाणार असून या चोरीसह राज्यातील अन्य चोरीशी याचा काही संबंध आहे का हे पोलीस पडताळून पाहणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa Today's Live News Update: बोडगेश्र्वर देवस्थानात पुन्हा चोरी; फंड पेटी फोडली

Gram Panchayat Karapur : कारापूर-सर्वण ग्रामपंचायत पर्यायी जागेच्या शोधात

नागरिकांची हत्या, मीडियावर बंदी… 'या' मुस्लिमबहुल देशात लष्कर अराजकता का निर्माण करतयं?

Loksabha Election 2024 : दोन्‍ही जागा ‘इंडिया’च जिंकणार! विरियातो फर्नांडिस

Goa News : राज्यात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे आवश्‍यक; मराठी राजभाषा साहित्य संमेलनात ठराव

SCROLL FOR NEXT