Ponda Municipality Golden Jubilee Dainik Gomantak
गोवा

15 वर्षांचा वनवास संपला; 'गोल्डन ज्युबिली' पूर्णत्‍वाकडे, फोंडावासीयांमध्‍ये समाधान, 98 टक्के काम पूर्ण; लवकरच होणार लोकार्पण

Ponda Municipality Golden Jubilee: फोंडा पालिकेचा महत्त्वाकांक्षी ‘गोल्डन ज्युबिली’ प्रकल्प तब्बल १५ वर्षांनंतर पूर्णत्वास आला असून, सुमारे ९८ टक्के काम पूर्ण झाले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

फोंडा: फोंडा पालिकेचा महत्त्वाकांक्षी ‘गोल्डन ज्युबिली’ प्रकल्प तब्बल १५ वर्षांनंतर पूर्णत्वास आला असून, सुमारे ९८ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात या प्रकल्पाचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे.

या प्रकल्पासाठी २०११ मध्ये निधी मंजूर होऊनही काम पूर्ण होण्यासाठी दीड दशक लागल्याने ‘देर आए, दुरुस्त आए’ अशी प्रतिक्रिया फोंडावासीयांकडून व्यक्त होत आहे.

गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त तत्कालीन काँग्रेस सरकारने २०११ मध्ये फोंडा पालिकेला या प्रकल्पासाठी दोन कोटी रुपये प्राथमिक निधी मंजूर केला होता.

रोजगाराच्या संधींबरोबरच विविध सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा बहुमजली प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. १९ डिसेंबर २०११ रोजी तत्कालीन आमदार रवी नाईक यांच्या हस्ते प्रकल्पाची पायाभरणी झाली होती.

नंतर या प्रकल्पाचे काम रखडले. आता ‘जी-सुडा’ने अतिरिक्त ३ कोटी ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर कामाला पुन्हा सुरुवात झाली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, नगरविकासमंत्री विश्वजीत राणे, स्थानिक आमदार व मंत्री तसेच फोंडा पालिका मंडळाच्या उपस्थितीत प्रकल्‍पाचे लोकार्पण होणार आहे.

रवी नाईक यांच्या ‘व्हिजन’चा प्रकल्प

फोंड्याचा सर्वांगीण विकास हेच आपले व्हिजन असल्याचे तत्कालीन आमदार रवी नाईक यांनी निश्चित केले होते. त्यानुसार मतदारसंघात विविध विकासकामे उभी राहिली. गोल्डन ज्युबिली प्रकल्पही त्याच संकल्पनेचा भाग असून, सुरुवातीचा दोन कोटी रुपयांचा निधी पालिकेला मिळवून दिला होता.

अद्ययावत वाचनालयाचे स्वप्न अधुरेच

गोल्डन ज्युबिली प्रकल्पासोबतच तिस्क-फोंडा येथील आरोग्य खात्याच्या वास्तूत पाटो-पणजी येथील सरकारी वाचनालयाच्या धर्तीवर अद्ययावत वाचनालय सुरू करण्याचा मानस रवी नाईक यांनी व्यक्त केला होता. मात्र, हा प्रकल्प सध्या बंद पडला असून, तो सुरू करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT