Ponda regulations Dainik Gomantak
गोवा

Ponda Municipal Council: ट्रेड लायसन्सचे नूतनीकरण केले नाही? फोंडा पालिका आकारणार 5 हजारांचा दंड!

Trade license Renewal: ट्रेड लायसन्सचे नूतनीकरण न केलेल्यांकडून ५ हजारांचा दंड वासून करण्यात येईल अशी माहिती जारी करण्यात आलीये

Akshata Chhatre

फोंडा: खर्चाशी झुंजत असलेल्या फोंडा पालिकेकडून २ कोटी भाडे वसूली करण्यात आलीये. मिळालेल्या माहितीनुसार आणखीन २ कोटी रुपयांची भाडे वसूली बाकी आहे. यासोबतच फुटपाथवर बसणाऱ्या विक्रत्यांनी जर का वेळीच जागा मोकळी केली नाही तर त्यांना हटवण्यात येईल अशी माहिती देखील पालिकेने जाहीर केलीये.

ट्रेड लायसन्सचे नूतनीकरण न केल्यास ५ हजारांचा दंड

काही दिवसांपूर्वी फोंडा पालिकेकडून मासिक वेतन बिल ४० लाख रुपये असल्याने फोंडा नगरपालिका सध्या आर्थिक वाढीसाठी घर कर वाढवण्याचा विचार सुरु होता. बुधवार (दि.५ मार्च) रोजी झालेल्या बैठकीत फोंडा पालिकेकडून काही महत्वाचे निर्णय घेतण्यात आलेत. यामध्ये खास करून ट्रेड लायसन्सचे नूतनीकरण न केलेल्यांकडून ५ हजारांचा दंड वासून करण्यात येईल अशी माहिती जारी करण्यात आलीये.

समोर आलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत 750 जणांनी ट्रेड लायसनांचे नुतनीकरण केलेले नाही. पालिकेचा बैठकीतील माहिती देताना नगराध्यक्ष आनंद नाईक यांनी पार्कींगची सोय नसताना विशाल मेगा मार्टला दिलेल्या परवानगीचा मुद्दा बैठकीत गाजल्याचं सांगितलं आणि या विषयावर तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन केली जाईल अशी माहिती देखील त्यांनी माध्यमांना दिली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार फोंडा नगरपालिका सध्या वाढत्या खर्चाचा सामना करतेय. वाढत्या खर्चामुळे फोंडा नगरपालिकेसमोर आर्थिक आव्हान आहे, आणि म्हणूनच फोंडा नगरपालिका सध्या आर्थिक वाढीसाठी घर कर वाढवण्याचा विचार करत होती. वाढत्या प्रशासकीय खर्चाचा समतोल साधण्यासाठी आणि महसूल गोळा करण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्यासाठी ही दरवाढ आवश्यक असल्याचे अध्यक्ष आनंद नाईक म्हणाले होते. सध्या फोंडा रहिवासी प्रति चौरस मीटर ७ रुपये प्रमाणे घरचा कर देतात. महत्वाचं म्हणजे वर्ष २०१९ पासून यामध्ये बदल करण्यात आलेले नाहीत आणि बाकी नगरपालिका आणि काही ग्रामपंचायतींच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी आहे असं नाईक म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी मोठी बातमी; महाराष्ट्राची मागणी सर्वोच्च न्यायालयाने केली मान्य, 8 वर्षांनी होणार सुनावणी

Taskin Ahmed Wicket: षटकार मारला, तरी पंचांनी दिलं आऊट; शेवटच्या ओव्हरमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा, मैदानात नेमकं काय घडलं? Watch Video

'राज्यभाषेचा दर्जा मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही', वाळपईत मराठी भाषाप्रेमींचे धरणे आंदोलन

Perani Jagar Vidhinatya: गोव्यातील अस्तंगत होत चाललेली कला! पेरणी जागर आणि विधीनाट्यातील मुखवटे

Shocking News: अजब प्रकार...! गुजरातमध्ये मृत व्यक्ती अचानक झाला जिवंत, डॉक्टरही हैराण; कुटुंबीय म्हणाले, "हा देवाचा चमत्कार"

SCROLL FOR NEXT