Ponda Municipal Council Meeting  Dainik Gomantak
गोवा

Ponda News: फोंड्यातील भंगारअड्डे त्वरित हटवले जाणार! पालिका बैठकीत कंत्राटदारांच्या कामावर नाराजी

Ponda Municipal Council: फोंडा पालिका बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. काही मुद्द्यांवरून नगरसेवक आक्रमक बनले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष आनंद नाईक होते. या बैठकीत पालिका क्षेत्रातील चार बेकायदा भंगारअड्डे त्वरित हटवण्यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda Municipal Council Meeting About Scrapyards

फोंडा: येथील पालिका बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. काही मुद्द्यांवरून नगरसेवक आक्रमक बनले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष आनंद नाईक होते. या बैठकीत पालिका क्षेत्रातील चार बेकायदा भंगारअड्डे त्वरित हटवण्यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला.

पालिका क्षेत्रात चार बेकायदा भंगारअड्डे हे व्यावसायिक तसेच निवासी संकुलांजवळ आहेत. त्यांच्याकडे कोणतेच परवाने नाहीत, तरीही हे भंगारअड्डे बिनधास्तपणे चालवले जात आहेत. या भंगारअड्ड्यांमुळे भविष्यात काही विपरीत परिणाम झाल्यास सर्व नागरिकांना त्याची झळ सोसावी लागेल. पालिकेने या भंगारअड्ड्यांना नोटीस पाठवली असून हे भंगारअड्डे हटविण्याची सूचना करण्यात आली आहे, असे बैठकीत सांगण्यात आले.

कोणत्याच प्रकारचे परवाने भंगारअड्डे चालवणाऱ्यांकडे नसल्याने हे भंगारअड्डे हटविण्याचा निर्णय झाला. वारखंडे, दुर्गाभाट तसेच कीर्ती हॉटेलजवळ हे भंगारअड्डे आहेत. हे भंगारअड्डे ब्रिजेश कश्‍यप, कलीम खान, रशीद खान व कासीम शेख यांच्याकडून चालवले जात आहेत. पालिका तसेच इतर संबंधित सरकारी यंत्रणांकडून कोणतेच परवाने घेतले नसल्याने हे बेकायदा भंगारअड्डे त्वरित हटवावे अशी मागणी नगरसेवकांनी केली.

पालिका क्षेत्रातील नवीन निवासी प्रकल्पांतील घरपट्टी वाढवण्याचा निर्णय बैठकीत झाला. फोंडा पालिकेच्या अखत्यारितील दुकानांचे आठजणांनी भाडे भरलेले नाही. त्यामुळे सुमारे साठ लाख रुपये थकले आहेत. हे पैसे पंधरा दिवसांत आले नाहीत तर ती दुकाने सील करण्याचा निर्णयही यावेळी झाला.

पालिका क्षेत्रातील काही आस्थापनांकडून अनेक फलक लावले जातात, त्यामुळे परिसर ओंगळवाणा दिसतो, त्याला आळा घालण्यासाठी एका आस्थापनाला फक्त एकच फलक लावण्याची सूचना करण्याचा निर्णयही यावेळी झाला. काही कंत्राटी कामगारांत कामावर येण्यात सातत्य नाही, त्यातच काहीजण काम सोडून गेल्यामुळे त्याजागी चार नवीन कामगार घेण्याचे यावेळी ठरले. फोंडा पालिका कार्यालयात कामासाठी येणाऱ्यांची बऱ्याचदा दिशाभूल होते किंवा केली जाते, त्यामुळे लोकांना मदतीसाठी ‘हेल्प डेस्क'' सुरू करण्यावरही यावेळी चर्चा झाली.

पालिका क्षेत्रात सध्या भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून अनेकांना चावे घेण्याचे प्रकार घडले आहेत. विशेषतः विद्यार्थ्यांना चावे घेण्याचे प्रमाण वाढल्याने भीतीचे वातावरण आहे. या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी नगरसेवकांनी बैठकीत केली. कुर्टीतील एका स्वयंसेवी संस्थेकडून कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जाते, त्याला वेग देताना पालिकेच्या पर्यवेक्षकाची नेमणूक प्रत्येक प्रभागात करून या भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचा निर्णय झाला.

उद्याने रात्री ८ पर्यंत ठेवणार खुली!

फोंडा पालिका क्षेत्रातील उद्याने रात्री ८ पर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय पालिका बैठकीत झाला. मुले व ज्येष्ठ नागरिकांना सोयिस्कर व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय पालिका क्षेत्रातील उद्यानांची निगा राखणे, सुरक्षारक्षक नेमणे तसेच उद्यानात येणाऱ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी एका आस्थापनाने तयारी दर्शवली आहे, या आस्थापनाची पूर्ण माहिती घेऊनच त्यानंतर ही उद्याने या आस्थापनाच्या स्वाधीन करण्याचा निर्णय बैठकीत झाला.

कंत्राटदारांच्या कामावर नाराजी..!

फोंडा पालिकेच्या बैठकीत बऱ्याच दिवसांनी नगरसेवक आक्रमक झालेले दिसले. विशेषतः माजी नगराध्यक्ष रितेश नाईक, नगरसेवक रूपक देसाई, माजी नगराध्यक्ष विश्‍वनाथ दळवी तसेच इतरांनी काही मुद्द्यांवरून आवाज चढवला. पालिका क्षेत्रातील कामे काही कंत्राटदारांनी घेऊनही त्यांनी ती केलेली नाहीत, अशांना ब्लॅकलिस्ट करण्याचा निर्णय फार पूर्वीच घेण्यात आला आहे. यावरुन रितेश नाईक यांनी आवाज चढवला. एका निवासी प्रकल्पाला भोगवटा दाखला

देण्यात पालिका चालढकल करीत असल्याने विश्‍वनाथ दळवी यांनीही आवाज चढवला. गेले वर्षभर हा दाखला देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

International Purple Festival 2025: 9 ऑक्टोबरपासून पणजीत रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल, नोंदणी अनिवार्य; जाणून घ्या स्थळ, थीम आणि प्रमुख आकर्षणे

Viral Video: स्टाईल मारत रील बनवणाऱ्या कपलचा जीवावर बेतणारा थरार व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले, 'लो भाई हो गया कांड'!

Goa Crime: पणजीत खळबळ! बसस्थानकाजवळ आढळला छत्तीसगडच्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह; परिसरात भीतीचे वातावरण

AUS W vs PAK W: भारतीय वंशाच्या अलाना किंगची कमाल, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रचला नवा इतिहास; मोडला 22 वर्ष जुना रेकॉर्ड

IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

SCROLL FOR NEXT