IFFI Movies at Ponda Dainik Gomantak
गोवा

IFFI Goa 2024: चित्रपट महोत्सवाला तुडुंब गर्दी; मात्र फोंड्याच्या ‘मूव्ही मॅजिकला’ अजूनही प्रेक्षक मिळेना

Movie Magic Theater Ponda: २००८ नंतर पहिल्यांदाच फोंड्यात ‘इफ्फी’ चे चित्रपट दाखवले जात असल्यामुळे या चित्रपटांना प्रेक्षकांची गर्दी होणं अपेक्षित होतं पण ही अपेक्षा फोल ठरली

Akshata Chhatre

फोंडा: गोव्यात सध्या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे वातावरण आहे. पणजी, पर्वरी, मडगाव यांसारख्या प्रमुख ठिकाणी इफ्फीच्या निमित्ताने देश विदेशातील चित्रपट दाखवले जातेयत. गोव्याचे कृषी मंत्री तसेच फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी पुढाकार घेतल्यामुळे फोंड्यात यंदा ‘इफ्फी’ चे चित्रपट दाखवले जात होते तरीही रसिकांकडून मात्र या चित्रपटांना अगदी थंडा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

फोंडा मार्केट यार्डमध्ये असलेल्या मूव्ही मॅजिक या चित्रपटगृहात इफ्फीच्या निमित्ताने चित्रपट दाखवले जात असले तरीही प्रेक्षकांचे पाय मात्र अजून या चित्रपटांकडे वळलेले दिसत नाहीत. वास्तविक २००८ नंतर पहिल्यांदाच फोंड्यात इफ्फीचे चित्रपट दाखवले जात असल्यामुळे या चित्रपटांना प्रेक्षकांची गर्दी होणं अपेक्षित होतं पण शुक्रवार, शनिवार, रविवार या गेल्या तीन दिवसांची उपस्थिती पाहता ही अपेक्षा फोल ठरली आहे.

यंदा फोंड्यात इफ्फीचे चित्रपट प्रदर्शित होत असले तरी त्याला प्रसिद्धीची योग्य किनार मिळालेली नाही. बस स्टॅन्ड, बाजार सारख्या मोक्याच्या ठिकाणी प्रसिद्धी फलक लावले असते तर लोकांना या चित्रपटांची माहिती मिळाली असती.

यावर्षी इफ्फीच्या चित्रपटांचा फोंड्यात हवा तसा गाजावाजा होऊ शकला नाही आणि म्हणून कदाचित प्रेक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचली नसावी पण पुढच्या वर्षी सर्व खबरदारी घेऊन हे चित्रपट दाखवण्यात येतील, त्याचप्रमाणे या प्रदर्शनाला व्यापक स्वरूपही देण्यात येईल अशी खात्री आयोजकांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Raid Kolkata: कोळसा घोटाळ्याचं 'गोवा कनेक्शन'! I-PAC वरील धाडीनं ममता बॅनर्जींचा हाय-व्होल्टेज ड्रामा; कोलकात्यात तणावाचं वातावरण

Nagnath Mahadev Temple Theft: पर्रा येथील नागनाथ महादेव मंदिरात तिसऱ्यांदा चोरी; 30 हजारांची रोकड लंपास, मूर्तीचीही विटंबना

Goa Land Scam: गोव्यातील बनावट पॉवर ऑफ ॲटर्नीचा खेळ खल्लास! SIT च्या धाकाने भूमाफिया पळाले; मुख्यमंत्री सावंतांचा दावा

Fatima Sana Shaikh In Goa: 20 मिनिटांचा संघर्ष अन् 'ती' धाडसी उडी! 'दंगल' गर्लचा गोव्यात थरार, फातिमा सना शेखचा Video Viral

Surya Gochar 2026: शनिच्या नक्षत्रात सूर्याचे आगमन; 18 मार्चपासून 'या' 3 राशींचे नशिब सोन्यासारखे चमकणार

SCROLL FOR NEXT