Court Dainik Gomantak
गोवा

Ponda Accident Case: अपघाती मृत्यू प्रकरणी नाईक कुटुंबीयांना तात्काळ भरपाई द्या! इन्शुरन्स कंपनीसह कारमालकाला लवादाचा आदेश

Sagar Babal Naik Case: सागर बाबल नाईक याचा अपघातात मृत्यू झाल्याप्रकरणी मोटार अपघात दावे लवादाने ३३.६२ लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी व अपघातग्रस्त कार मालकाला दिला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: फोंडा येथे आठ वर्षापूर्वी सागर बाबल नाईक याचा अपघातात मृत्यू झाल्याप्रकरणी मोटार अपघात दावे लवादाने ३३.६२ लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी व अपघातग्रस्त कार मालकाला दिला. ही रक्कम ९ टक्के व्याजदराने अर्ज केल्यापासून ३० दिवसांच्या आत द्यावी. ही भरपाई दिलेल्या मुदतीत न जमा केल्यास अतिरिक्त आणखी २ टक्के व्याज द्यावे लागेल, असे लवादाने निवाड्यात नमूद केले आहे.

सागर बाबल नाईक हा १४ फेब्रुवारी २०१७ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास भाटी शिरोडा येथून वाझे शिरोडा दिशेने दुचाकीने जात होता. फोंडा येथील सेंट अँथनी चर्चजवळ पोचला असता कार चालकाने ओव्हरटेकिंग करत असताना दुचाकीला मागाहून जोरदार धडक दिली. या धडकेने दुचाकी चालक सागर हा जागीच ठार झाला होता. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी (Police) पंचनामा करून कार मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सागर बाबल नाईक हा कुटुंबातील एकमेव कमवता असल्याने त्याची आई भगवंती बाबल नाईक, भाऊ सत्यजीत बाबल नाईक व अपर्णा सत्यजीत नाईक या तिघांनी मोटार अपघात दावे लवादाकडे भरपाईसाठी अर्ज केला होता. त्यांचे कुटुंब अपघातात ठार झालेल्या सार बाबल नाईक याच्यावरच अवलंबून होते, असा दावा केला होता. त्यामुळे विमा कंपनी तसेच ट्रक मालकाला ३९.७० लाखांची भरपाई देण्याचा आदेश द्यावा अशी विनंती केली होती.

फोंडा (Ponda) पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. कार चालकाच्या अतिवेगामुळे तसेच ओव्हरटेकमुळे हा अपघात झाला होता. या अपघाताला कारचालक कारणीभूत असल्याचा निष्कर्ष लवादाने काढला. मयत सागर नाईक याच्यावर त्याचे कुटुंब अवलंबून असल्याने त्याला भरपाई देण्याचे निरीक्षण करत ३३.६२ लाख रुपये भरपाई देण्याचा निर्देश दिले आहेत. या भरपाईमधील ३१,८१,०३८ रुपये, १८१५० रुपये, १८१५० रुपये व ४८,४०० रुपये मयत सागर नाईक याच्या आईला तर ४८,४०० रुपये प्रत्येकी भाऊ व भावजयला देण्यात यावेत असे निवाड्यात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT