Water Problem in Ponda Dainik Gomantak
गोवा

Water Problem: फोंडा, धारबांदोडा तालुक्यांमध्ये भर उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भीक्ष; टँकरवर भिस्त

वाढत्या लोकवस्तीमुळे जुनी पाणीपुरवठा यंत्रणा फेल

दैनिक गोमन्तक

एकनाथ खेडेकर

Water Problem in Ponda: फोंडा व धारबांदोडा तालुक्यांत भर उन्हाळ्यात काही ठिकाणी पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस वाढणारी लोकवस्ती पाहता भविष्यात पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. भविष्यातील पाण्याचा तुटवडा दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने आताच तरतूद करण्याची गरज आहे.

कित्येक वर्षांपूर्वी उभारलेल्या ओपा येथील जलशुद्धीकरण प्रकल्पावर तिसवाडी व काही अंशी फोंडा तालुक्याची गरज पुरी होते. परंतु ओपा प्रकल्पाजवळच पण वरच्या बाजूला असलेल्या गावांत पाणीटंचाई जाणवते. साबांखाने काही वर्षांपासून गांजे येथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात सुरुवात केली आहे.

प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण होणार असून उसगाव, प्रियोळ येथील पाण्याची समस्या दूर होणार आहे. दूधसागर नदीच्या काठावरील गावांमध्ये साबांखाने फिल्टर बसवून पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. परंतु लोकवस्ती वाढल्याने भविष्यात कुळे परिसरात नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची गरज आहे. यासाठी स्थानिक रहिवाशांनी लोकप्रतिनिधींना साकडे घातले आहे.

धावशिरेतील टाकी विनावापर

उसगावातील लोकसंख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे येथे पाणीटंचाई जाणवते. धावशिरे-उसगाव येथील पाण्याची टाकी विनावापर पडून आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी साबांखाने टाकीची दुरुस्तीही केली होती. परंतु अजूनही टाकी वापरात आली नसल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अनेक गावांतील विहिरी आटल्या

शिरोडा परिसरातील अनेक गावांत सध्या पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाज, तोर्ल, माकाडसाय, साखरव्हाळ व अन्य गावांतील विहिरी पूर्णपणे आटल्या आहेत. त्यामुळे साबांखाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. टँकरचे पाणी साठवून ते लोकांना पुरवून वापरावे लागत आहे.

शिरोडा परिसरात पाणीटंचाई

  • येथील वाढणारी लोकवस्ती पाहता कित्येक वर्षांपूर्वी घातलेल्या पाण्याच्या छोट्या वाहिन्या बदलण्याची गरज आहे. मे महिन्यात विहिरीचे पाणी आटत असल्याने लोकांची गैरसोय होत आहे.

  • साबांखाकडून शिरोडा पंचायत क्षेत्रात दोन पाण्याचे टँकर पाठविण्यात येत आहेत. सध्या विहिरी आटल्या आहेत. पाऊस सुरू झाल्यानंतर विहिरींच्या पाण्याची पातळी वाढेल. त्यामुळे पाऊस सुरू होईपर्यंत पाण्याच्या टँकरवरच भिस्त असेल.

  • उसगाव पंचायत क्षेत्रातील लोकांसाठी सार्वजनिक नळ उपलब्ध करून दिले आहेत. परंतु सार्वजनिक नळाच्या ठिकाणी वाहने धुतली जातात. तसेच कित्येक वेळा पाणी नळातून वाहून जात असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT