Crime News Dainik Gomantak
गोवा

Crime News : फोंड्यातील घटना डोक्यात दगड घालून मामाकडून भाच्याचा खून

Crime News : या भांडणात मामा कृष्णा सदाशिव नाईक (वय ६७) याने आपला भाचा अविनाश धनंजय नाईक (वय ४२) याच्या डोक्यावर दगड घालून त्याचा खून करण्याची घटना काल मध्यरात्री घडली.

गोमन्तक डिजिटल टीम

Crime News :

फोंडा, सांताक्रूझ - फोंडा येथे घर दुरुस्तीवरून मामा भाच्यात झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान भांडणात होऊन भाच्याला आपला जीव गमवावा लागला.

या भांडणात मामा कृष्णा सदाशिव नाईक (वय ६७) याने आपला भाचा अविनाश धनंजय नाईक (वय ४२) याच्या डोक्यावर दगड घालून त्याचा खून करण्याची घटना काल मध्यरात्री घडली. फोंडा पोलिसांत या प्रकरणी तक्रार दाखल केल्याने फोंडा पोलिसांनी मामाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांताक्रूझ - फोंडा येथे कृष्णा नाईक याचे मातीचे घर आहे. या घरात कृष्णा व त्याची पत्नी राहते, तर या घरातील एका खोलीत कृष्णा याचा सख्खा भाचा अविनाश नाईक राहत होता.

दोन महिन्यांपूर्वी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे घरातील अविनाश राहत होता तेथील पत्र्याचे छप्पर उडून गेले होते. आता पावसाळा तोंडावर आल्याने घराची भिंत भिजून घर कोसळू नये यासाठी मामाने भाच्याला पत्रे आणून घर शाकारण्यास सांगितले होते.

भाचा अविनाश नाईक हा ‘डिलिव्हरी बॉय’ म्हणून काम करत होता. सकाळी कामावर जाताना अविनाश मामाला रोज पत्रे आज आणून घालतो म्हणून सांगून घराबाहेर पडायचा, पण गेले दोन महिने या पत्र्यांचा पत्ताच नसल्याने मामा कृष्णा वैतागला होता.

काल रात्री भाचा अविनाश दारू पिऊन घरी आला आणि रिकाम्या बादलीवर त्याने लाथ मारल्याने मोठा आवाज झाला. यावेळी मामा कृष्णाने भाच्याला जाब विचारला असता त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. यावेळी भाच्याने मामा व मामीला मारल्याने रात्री उशिरा मामा कृष्णा याने भाच्याच्या डोक्यात दगड घातला.

त्यात जखमी होऊन भाचा अविनाश मरण पावला. त्याच्या छातीवरही दगड घातल्याच्या खुणा आहेत. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अविनाश याची सावईवेरे येथे लग्न करून दिलेली बहीण अमिता शैलेश नाईक हिने फोंडा पोलिसांना कळवल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कारवाई केली. फोंडा पोलिस निरीक्षक या प्रकरणी तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT