Ponda Footpath Encroachment Dainik Gomantak
गोवा

Ponda Footpath Encroachment: फोंड्यात चालायचे कुठून? पदपथांवर अतिक्रमण, पार्किंगच्या जागांवर जाहिरात फलकांची वाहने!

Goa Traffic Issues: फोंडा शहरातील पदपथांवर विक्रेत्यांनी मांडलेला माल आणि बेकायदा पार्क केलेल्या वाहनांमुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

फोंडा: फोंडा शहरातील पदपथांवर विक्रेत्यांनी मांडलेला माल आणि बेकायदा पार्क केलेल्या वाहनांमुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. वरचा बाजार परिसरात पार्किंगच्या जागेत जाहिरात फलक असलेली वाहने उभी केली जात असल्याने वाहनचालकांसमोरही पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला आहे.

फोंड्यातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून पदपथांवर विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः रविवारी जागा मिळेल तेथे विक्रेते आपला माल मांडत असल्याने पादचाऱ्यांना पदपथावरून चालणे कठीण होत आहे. त्यामुळे त्यांना नाइलाजाने रस्त्यावरून चालावे लागत असून अपघाताचा धोकाही वाढत आहे.

फोंडा मार्केट संकुलातील पार्किंगच्या जागेत मासळी विक्रेत्यांना जागा देण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहने पार्क करण्यासाठी जागा शोधावी लागत आहे. त्यातच मार्केट संकुलासमोरील पार्किंगच्या जागेत जाहिरात फलक असलेली वाहने उभी केली जात असल्याने उपलब्ध जागेचा वापर कसा केला जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सगळीकडे अनागोंदी

फोंडा नगरपालिका क्षेत्रातील पार्किंगच्या जागा आता कुठे दिसतच नाहीत. जागा मिळेल तेथे विक्रेते आपला माल मांडतात, वाहनचालक आपली वाहने कुठेही कशीही ठेवतात, त्यामुळे पादचाऱ्यांचे काय? फोंडा पालिकेने ही अनागोंदी थांबवण्यासाठी धडक कारवाई करायला हवी. विक्रेत्यांना मार्केट असताना हे लोक रस्त्यावर काय करीत आहेत? त्यांच्यामुळे शहरात पादचाऱ्यांना खूपच त्रास सहन करावी लागत आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ता जॉन मास्कारेन्हस व्यक्त केले.

फोंड्यातील पदपथांवर फिरते विक्रेते बिनधास्त आक्रमण करतात, आणि पालिका कोणतीच कारवाई करीत नाही. पदपथ या विक्रेते आणि वाहनांनी बळकावल्यामुळे लोकांना नाईलाजाने रस्त्यावरून जावे लागते, त्यामुळे अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण याचा जाब पालिकेने द्यायला हवा.

- विराज सप्रे

(सामाजिक कार्यकर्ता, फोंडा)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Upcoming SmartPhones: 10,000 mAh बॅटरी, 200MP कॅमेऱ्यासह मिळणार भन्नाट फीचर्स! या आठवड्यात लॉन्च होणार 'हे' दमदार स्मार्टफोन

SIR Protest India: 'एसआयआर'विरोधी आंदोलन निर्णायक वळणावर

Goa Politics: 'तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना'; मगो-भाजप युतीत फोंडा-शिरोड्याचा पेच!

Goa Politics: आरजीतील अंतर्गत वाद पुन्हा चिघळला! 'पक्षाला हानी पोहोचवल्यास कारवाई', वीरेश बोरकरांचा खोलकरांना इशारा

'Mumbai Indians'ची नवी रणनीती! प्रशिक्षक बदलल्यानंतर आता कर्णधारपदावरून हार्दिक पांड्याची सुट्टी? रोहित शर्माच्या हाती पुन्हा संघाची कमान; दिग्गजाची मोठी भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT