Suhana Naik Dainik Gomantak
गोवा

Cash For Job Scam: 18 लाखांच्या बदल्यात सरकारी नोकरीचं आमिष, ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणी सुहाना नाईकची कसून चौकशी! पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली

Suhana Naik Arrest news: फोंड्यात उघडकीस आलेल्या ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेली भंडारवाडा-आमोणा येथील सुहाना नाईक हिची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

फोंडा: फोंड्यात उघडकीस आलेल्या ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेली भंडारवाडा-आमोणा येथील सुहाना नाईक हिची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. अद्याप या प्रकरणी इतर कोणतीही अधिकृत तक्रार नोंद झालेली नसली, तरी पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत.

सुहाना नाईक ही सराईत गुन्हेगार आहे काय?, तसेच नोकऱ्या मिळवून देण्याच्या नावाखाली तिचे इतर कोणाशी संबंध किंवा संपर्क आहेत काय?, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उसगाव येथील तिघांकडून सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुहाना नाईक हिने तब्बल १८ लाख रुपये उकळले होते. मात्र ठरलेल्या कालावधीनंतरही नोकरीबाबत कोणतीही हालचाल न झाल्याने संबंधितांनी तिच्याकडे पैशांची मागणी सुरू केली. वारंवार तगादा लावूनही पैसे परत न मिळाल्याने अखेरीस फोंडा पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत सुहाना नाईक हिला ताब्यात घेतले.

धक्कादायक गोष्‍टी समोर येण्याची शक्‍यता

या प्रकरणाचा तपास फोंडा पोलिसांकडून सुरू असून आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्‍यान, पैसे देऊन नोकऱ्या मिळत असतील, तर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Law And Order: आकड्यांचा सलाम!

Goans Surrender Passports: रोज सरासरी 5 गोमंतकीय पासपोर्ट करतात सरेंडर; 3.5 वर्षांत तब्बल 6,960 जणांनी पासपोर्ट सोडला

Diamond Robbery: 380000000 चा 200 कॅरेटचा हिऱ्यांचा हार लंपास, 95 वर्षांचा शाही इतिहास! ऑस्ट्रियातील घटनेनं खळबळ; इंटरपोलकडून चोरट्यांचा शोध सुरु

Goa PSC Chairman Appointment: 'गोवा लोकसेवा' अध्यक्ष नियुक्तीला हायकोर्टात आव्हान; राज्य सरकारसह उदयसिंह रावराणे यांना नोटीस

खरी कुजबुज: कलियुगातील 'लव-कुश'

SCROLL FOR NEXT