Ponda And Sanquelim Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Sanquelim Ponda Municipality Election 2023: साखळी, फोंडा पालिका निवडणूक! कलम 144, मद्यबंदी अन् पगारी सुट्टी, एका क्लिकवर जाणून घ्या सगळं काही

निवडणुकीच्या अनुषंगाने कलम 144 लागू

गोमन्तक डिजिटल टीम

Sanquelim Ponda Municipality Election 2023: साखळी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पालिका क्षेत्रात 5 ते 7 मे पर्यंत जमावबंदीचे 144 कलम लागू केले आहे. उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकारी यांनी तसा आदेश काढला आहे.

दरम्यान गोवा सरकारने 5 मे हा दिवस फोंडा व साखळी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'पगारी सुट्टी' घोषित केली आहे.

फोंडा व साखळी पालिका निवडणुकीतील मतदारांसाठी "मतदान दिवस" म्हणून 'पगारी सुट्टी' घोषित केली आहे.

येत्या 5 मे रोजी उत्तर गोव्यातील साखळी नगरपालिकेसाठी मतदान होत असून 7 मे रोजी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने कलम 144 लागू केले आहे.

जिल्हा दंडाधिकार्‍यांनी दिलेला हा आदेश सर्व रेस्टॉरंट, बार, चहाची दुकाने, मॉल यांना लागू आहेत.

याशिवाय मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या आत असलेली दुकाने, भोजनालये आणि इतर खाद्यपदार्थांची दुकाने, आस्थापने (ढाबा, गाडा) इ. बंद राहतील.

याशिवाय नगरपालिकेच्या हद्दीतील मतदान केंद्रांच्या 100 मीटर परिसरात 5 पेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही मेळाव्यास किंवा गर्दीवर बंदी घालण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Bomb Blast: पाकिस्तान हादरलं! खैबर पख्तूनख्वामध्ये नमाजादरम्यान रक्ताचा सडा; भीषण आत्मघाती हल्ल्यात 16 ठार, 50 हून अधिक जखमी

Abhishek Sharma Shiva Celebration: 'प्लेयर ऑफ द सिरीज' ठरल्यानंतर अभिषेक शर्माचा मोठा खुलासा, सेंच्युरीनंतरच्या 'शिव सेलिब्रेशन'विषयी स्पष्टच सांगितलं; म्हणाला...

Porvorim Traffic Congestion: 'उन्‍नत'मार्गावर प्रगती, रस्त्यावर मात्र कोंडी

Jos Buttler World Record: 9 शतके, 107 अर्धशतके अन् 15000 धावा! टी-20 मध्ये बटलरने रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा बनला जगातील पहिलाच फलंदाज VIDEO

Mapusa Kidnapping Case: दोन अपहरण प्रकरणे, दोन राज्यात तपास अन् चौघांची सुखरुप सुटका, म्हापसा पोलिसांची धडक कारवाई; एक संशयित गजाआड

SCROLL FOR NEXT