Ponda Hit And Run Case
Ponda Hit And Run Case Dainik Gomantak
गोवा

Ponda Hit And Run Case: गोव्यात पादचारीही असुरक्षित; उसगावात एकाला ट्रकने चिरडले

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda Hit And Run Case

खांडेपार-मोले महामार्गावर पार-उसगाव येथे आज अवजड ट्रकने चिरडल्याने आनंद धर्मा नाईक (वय ५७ वर्षे) हे जागीच ठार झाले. हा अपघात इतका भयानक होता की, मृताच्‍या शरीराचा चेंदामेंदा झाला, तर डोके ट्रकच्या चाकांमध्ये अडकून सुमारे शंभर मीटर दूरवर पडले.

अपघात होताच चालकाने ट्रकसह घटनास्थळाहून पोबारा केला. मात्र, पोलिसांनी चालकाला ट्रकसह पकडले असता, अपघात झाल्याचे माहीतच नसल्याचे त्‍याने पोलिसांना सांगितले. अपघात झाला, त्यावेळी जोरदार पाऊस पडत होता, अशी माहिती ट्रकचालकाने दिली. मृताची उशिरा ओळख पटवण्यात आली. आनंद नाईक यांचे खुरसाकडे पार-उसगाव येथे घर आहे. दुपारी ते घरी जात असताना हा अपघात झाला.

पादचारीही असुरक्षित

ट्रक दहाचाकी असून तो धारबांदोडा येथे पकडण्यात आला. हा ट्रक कुर्टी-फोंड्याहून मोलेच्या दिशेने जात होता. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी इस्पितळात पाठविला असून पुढील चौकशी सुरू आहे.

रस्ता पार करताना काळाचा घाला

अपघात झाला त्यावेळी जोरदार पाऊस कोसळत होता. वादळी वारा आणि जोरदार पावसामुळे समोरचे काहीच दिसत नव्हते. त्याचवेळी भिजत चाललेल्या आनंद नाईक यांनी रस्ता पार करण्याचा प्रयत्न केला असता समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकच्या दर्शनी भागाच्या कडेला ते आपटले आणि ट्रकच्या चाकाखाली सापडले. यावेळी त्यांचे डोके आणि अर्धे शरीर ट्रकच्या खाली आल्याने ते जागीच ठार झाले.

टायरला चिकटले होते मांस

अपघातग्रस्त ट्रक पकडल्यानंतर पोलिसांच्या फॉरेन्सिक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ट्रकची पाहणी केली. यावेळी त्यांना टायरला मांस चिकटल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी ट्रकचालक धनानाथ हिरानाथ जोगी (वय ६६ वर्षे, रा. उदयपूर - राजस्थान) याला अटक केली असून पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

रस्त्याचा घोळ आणि सरकारी अनास्था

खांडेपार येथील नवीन पुलाकडून पुढे खुरसाकडे ठिकाणापर्यंत चौपदरी रस्ता केला आहे. खुरसाकडे आल्यानंतर पुढे रस्ता अरुंद आहे. तेथेच वळण असल्याने परराज्यातील वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नाही. भरधाव वाहने या अरुंद रस्त्यावर पोचताच समोरून एखादे वाहन आल्यास अचानक ब्रेक लावावा लागतो.

त्यामुळे अपघात होतात. गेली सहा वर्षे या चौपदरी रस्त्याचे काम रखडले आहे. चौपदरीकरण करण्यासाठी अनास्था असल्याने अपघातांना निमंत्रणच मिळत आहे. हा रस्ता पुढे मोलेपर्यंत चौपदरी करण्यात येणार आहे; पण जमीन संपादित करूनही त्याच्या पुढील सोपस्कारासाठी हे काम अडून पडले असल्याची माहिती देण्यात आली.

टायरच्या फटीत अडकले डोके

अपघातावेळी टायरच्या फटीत आनंद नाईक यांचे डोके अडकले आणि सुमारे शंभरपेक्षा जास्त मीटर ट्रक तसाच पुढे गेला. पुढे गेल्यावर टायरमध्ये अडकलेले डोके खाली पडले; पण तेही ओळखण्याच्या पलीकडे होते. हा भयानक अपघात पाहणाऱ्यांची भीतीने बोबडीच वळली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आनंद यांचे घर समोरच शंभर मीटरवर खुरसाकडे थांब्याच्या जवळ आहे. पत्नी आणि मुलांसमवेत राहणारा आनंद नाईक हे रोजगारासाठी मिळेल ते काम करायचे, अशी माहिती मिळाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Assagao Demolition: रमजानच्या दिवशी दोनापावल येथे शिजला घर पाडण्याचा कट, पूजा शर्माची अटक टाळण्यासाठी धडपड

Colva Police: सतावणूक केली, शंभर डॉलरही घेतले; कोलवाच्या 'त्या' PSI विरोधात आणखी एका महिलेची तक्रार

Goa Accident: अपघात नव्हे घातपात! कन्‍हैया कुमारच्या शरीरावर आढळल्या वाराचे निशाण, फोंडा पोलिस संशयाच्‍या घेऱ्यात

Goa DGP जसपाल सिंग तातडीने दिल्लीत का गेले होते? बदलीबाबत हालचालींना वेग

कोणत्याही क्षणी येणार आदेश, Goa DGP जसपाल सिंग तातडीने दिल्लीला रवाना

SCROLL FOR NEXT