Deepak Dhavalikar  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'ज्या मतदारसंघात प्राबल्य , त्याला आपण प्राधान्य देऊ'; 2027 निवडणुकीसाठी ढवळीकरांचा शड्डू

Deepak Dhavalikar : निवडणुकीला अजून दोन वर्षे आहेत, त्यामुळे काहीजण गडबडून गेलेत, असे दिसते, असा उपरोधिक टोला मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी मंत्री गावडेंना लगावला.

Sameer Panditrao

Deepak Dhavalikar Political News

पणजी: फोंडा तालुक्यातून आपण २०२७ ची निवडणूक लढवू इच्छितो, आणि ज्या मतदारसंघात प्राबल्य आहे, त्याला आपण प्राधान्य देऊ असे म्हणालो आहे. परंतु निवडणुकीला अजून दोन वर्षे आहेत, त्यामुळे काहीजण गडबडून गेलेत, असे दिसते, असा उपरोधिक टोला मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी मंत्री गावडेंना लगावला.

आपल्याला कोणी एका व्यक्तीने युतीत घेतलेले नाही. भाजपच्या नेतृत्वाने आम्हाला युतीत घेतले आहे, हे आमच्यावर नाहक आरोप करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे, असेही ते म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी कारण एका मुलाखतीत ढवळीकर यांनी आपली इच्छा बोलून दाखविली होती. त्यावर मंत्री गावडे यांनी जे राजकारणी आपण फोंड्यात कुठेही उभे राहून निवडून येऊ शकतो असे सांगत आहेत, त्यांना अगोदर भाजपशी असलेली युती तोडावी, अशी टीका केली होती.

त्याला आता ढवळीकर यांनी कानपिचक्या दिल्या आहेत. ‘गोमन्तक' शी बोलताना ढवळीकर म्हणाले, घटनेनुसार सर्वांना मते मांडण्याचा अधिकार आहे आणि कोणी कोठेही निवडणूक लढवू शकतो. त्याशिवाय राज्यात मगोप आणि भाजप एकत्रित २०२७ च्या निवडणूक लढल्यास गोव्यात पुन्हा एकहाती सत्ता येईल, आमदार आयात करावे लागणार नाहीत,असेही आपण सांगितले होते.

पत्रकारांनी आपणास निवडणूक लढविण्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर वरीलप्रमाणे आपण इच्छा व्यक्त केली. परंतु त्यावर कोण डगमगू लागल्यास त्याला आपण काय करणार, असेही दीपक ढवळीकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

SCROLL FOR NEXT