Pollution due to coal in Vasco Dainik Gomantak
गोवा

कोळसा भुकटीमुळे वास्को सडा, बायणा भाग काळवंडला

'आप'ची तक्रार, कोळसा हाताळणी थांबविण्याची मागणी

दैनिक गोमन्तक

वास्को : वास्को भागात ताशी 30 कि.मी. पेक्षा अधिक वेगाने वारे वाहत असतानाही मुरगाव बंदरात कोळसा हाताळणी मोठ्या प्रमाणात होत असल्याने सडा ते बायणा तसेच वास्को शहरातील काही भाग कोळशाच्या भुकटीने काळवंडले. याविषयी रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली असून आपचे उमेदवार परशुराम सोनुर्लेकर यांनी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाला तक्रार दाखल केली आहे. (Pollution due to coal in Vasco News Updates)

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात वाऱ्याचा वेग हा अधिक असतो. त्यामुळे या वाऱ्याच्या प्रवाहात वास्को (Vasco) शहराबरोबर इतर भागात धूळ प्रदूषण हे साहजिकच आहे. मुरगाव बंदरात कोळसा हाताळणीमुळे मुरगाव तालुका प्रदूषणाने त्रस्त आहे. दरम्यान, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाने फेब्रुवारी 2019 मध्ये नोटीस जारी करून वाऱ्याचा वेग तासी 30 कि.मी. असल्यास कोळसा हाताळणी न करण्याचे आदेश जिंदाल व अदानी कंपन्यांना दिले होते. मात्र, गेला महिनाभर दररोज वाऱ्याचा वेग तासी 30 कि.मी.हून जास्त असूनही कोळसा हाताळणी सुरूच आहे. त्यामुळे मुरगाव (Mormugao) बंदर जवळील हेडलँड सडा, वास्को शहर व इतर भागात कोळशाची भुकटी घराघरात, दुकानात, आस्थापनांत पसरत आहे. त्यामुळे लोकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.

दरम्यान, याविषयी गोवा फर्स्टचे परशुराम सोनुर्लेकर यांनी सदर प्रकार सर्व संबंधित प्राधिकरणांच्या निदर्शनास आणून दिले. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाचे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे अदानी आणि जिंदाल स्टॅकिंग क्षेत्रातून कोळसा हाताळणी बिनधास्त करत आहे. या प्रकाराचा त्रास स्थानिक लोकांना सोसावा लागत असल्याचे त्यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाला दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'रोमिओ लेन'वर बुलडोझर ॲक्शन! मालक फरार होताच CM सावंतांचे फर्मान, पाडकाम पथके सज्ज; कोणत्याही क्षणी होणार भुईसपाट

VEDIO: आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची नाचक्की..! लंडनमध्ये गृहमंत्र्यांची गाडी अडकून पोलिसांनी केली तपासणी; काय नेमकं घडलं?

IND vs PAK: 'सुपर संडे' स्पेशल! पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यात रंगणार महासंग्राम; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार सामना?

हडफडेतील 'ती' दुर्घटना नव्हे हत्याच! डॉ. ऑस्कर आज परप्रांतीय गेले, उद्या गोमंतकीयांवर बेतेल - डॉ. ऑस्कर रिबेलो

Goa Nightclub Fire: क्लब मालकांना इंडिगो विमानाने देशाबाहेर पळवलं! बेकायदेशीर पब्ज कायदेशीर करण्याचं भाजपचं षडयंत्र: विजय सरदेसाईंचा सावंत सरकारवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT