Politics  Dainik Gomantak
गोवा

फोंड्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा मेळावा संपन्न

फोंड्यात विठोबा देवस्थान सभागृहात गमगो पक्षाचा फोंड्यातील कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळेला सुदिन ढवळीकर यांनी भाजपवर (BJP) कडाडून टीका केली.

दैनिक गोमन्तक

Politics: मगो पक्ष सत्तेवर आल्यास प्रत्येक घरातील महिला प्रमुखाला मासिक पाच हजार रुपये देण्याबरोबरच कंत्राटी कामगार तसेच अर्धवेळ कामावर असलेल्या शिक्षकांना (Teacher) सेवेत कायम करण्याचे अभिवचन मगो पक्षातर्फे आमदार सुदिन ढवळीकर यांनी दिले.

फोंड्यात विठोबा देवस्थान सभागृहात मगो पक्षाचा (MGP) फोंड्यातील कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळेला सुदिन ढवळीकर यांनी भाजपवर (BJP) कडाडून टीका केली. यावेळी सुदिन ढवळीकर यांच्यासमवेत फोंड्यातील मगोचे नेते डॉ. केतन भाटीकर, मगो केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अनंत नाईक, अनील नाईक आदी उपस्थित होते.

सुदिन ढवळीकर म्हणाले की, मगो आणि तृणमूल काँग्रेसचे (TMC) युती सरकार राज्यात सत्तेवर आले तर कुटुंब चालवण्यासाठी प्रत्येक घरातील महिला प्रमुखाला महिना पाच हजार रुपये देण्यात येतील. त्यासाठीची कार्ड योजना आताच राबवण्यात येणार आहे. मगो आणि तृणमूलच्या युतीसाठी भाजपकडून अभद्र युती असे संबोधले जात असल्याने ज्या वेळेला केंद्रात तृणमूलच्या ममता बॅनर्जी व अटलबिहारी वाजपेयी यांची युती होती, त्यावेळेला ही युती अभद्र नव्हती काय, असा सवाल करून स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांचे आमदार पळवणाऱ्या भाजपने स्वतःच्या पायाखाली काय जळते आहे ते आधी पहावे असे सल्ला दिला. भाटीकर म्हणाले, निष्ठावंत कार्यकर्ते हीच मगोची ताकद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT