Goa Politics Michael Lobo Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: दिल्लीतून पैसे घेतल्याची एक तरी सेटिंग सिद्ध करून दाखवा, RGP पक्षच बंद करू; तुकारामांचे 'मायकल'ना ओपन चॅलेंज

Anjuna Beach Development controversy: मायकल लोबो यांच्या 'सेटिंग'च्या आरोपाला रिव्होल्यूशनरी गोवन्सचे अध्यक्ष मनोज परब यांनी थेट आव्हान दिले आहे

Akshata Chhatre

हणजूण: गोव्यातील आमदार मायकल लोबो आणि रिव्होल्यूशनरी गोवन्स (RGP) पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांच्यातील वाद आता केवळ शाब्दिक आरोप-प्रत्यारोपांपुरता मर्यादित न राहता, थेट आव्हानांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. मायकल लोबो यांचा मुलगा डॅनियल लोबो यांनी हणजूण-कायसूव पंचायतीच्या हद्दीत, समुद्राच्या बाजूने बेकायदा भिंत बांधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आरजीपीकडून करण्यात आला आणि हे प्रकरण आता गोव्याच्या राजकारणात चांगलेच तापले आहे.

आरजीपीचा पक्ष बंद करण्याचे थेट आव्हान

मायकल लोबो यांच्या 'सेटिंग'च्या आरोपाला रिव्होल्यूशनरी गोवन्सचे अध्यक्ष मनोज परब यांनी थेट आव्हान दिले आहे. "आरजीपीने दिल्लीतील बिल्डर लॉबीकडून पैसे घेऊन कोणतीही तक्रार मागे घेतल्याचे एक तरी 'सेटिंग' जर मंत्री मायकल लोबो यांनी सिद्ध करून दाखवले, तर आम्ही आरजीपी पक्ष बंद करायला तयार आहोत," असे परब म्हणालेत.

आमदार मायकल लोबो यांनी दोनच दिवसांपूर्वी काही सामाजिक कार्यकर्ते 'सेटिंग' करून, तक्रारी मागे घेतात आणि स्थानिक गोमंतकीयांची कामे बंद पाडतात, असा उद्विग्न शेरा मारला होता. लोबो यांच्या या आरोपानंतर केवळ २४ तासांत त्यांच्याच मुलाच्या बांधकामावर पंचायतीने कारवाईचा बडगा उगारल्याने हा विषय अधिक गंभीर झाला आहे. स्थानिक पंचायतीने डॅनियल लोबो यांच्या या बेकायदा बांधकामावर तातडीने काम बंद करण्याची नोटीस बजावली आहे.

बुधवार (दि.२२) रोजी परब हे कार्यकर्त्यांसह थेट हणजूण-कायसूव परिसरात दाखल झाले आणि त्यांनी डॅनियल लोबो यांच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. लोबो कुटुंबाचे बांधकाम जलसंपदा खात्याच्या परवानगीने सुरू असल्याचा दावा केला जात असला तरी, स्थानिक नागरिकांनी आणि आरजीपी कार्यकर्त्यांनी ते बेकायदा असल्याचा आक्षेप घेतला.

'भ्रमिष्ट' नेता vs 'सेटिंग'चा आरोप

आमदार मायकल लोबो यांनी आरजीपी आणि परब यांच्या भूमिकेवर तीव्र टीका केली आहे. "आरजीचे अध्यक्ष मनोज परब हे बऱ्याच काळानंतर सक्रिय झालेले नेते असून, ते गोव्याच्या लोकांना भ्रमिष्ट करण्याचे काम करत आहेत," असे लोबो म्हणाले.

"गोमंतकीयांचे कामे बंद करणे सोपे आहे. हिंमत असेल तर बार्देशसह हरमल ते केरीपर्यंत किनारी भागात अनेक दिल्लीस्थित बिल्डर लॉबीकडून सुरू असलेली बेकायदा कामे बंद करून दाखवा." गोमंतकीयाने गोमंतकीयांकडून घेतलेल्या मालमत्तेत जलसंपदा खात्याच्या परवानगीने भिंत बांधणे गैर नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT