Devendra Fadanvis And Sanjay Raut on Utpal Parrikar Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: उत्पलच्या उमेदवारीवरून महाराष्ट्रात राजकारण

दैनिक गोमन्तक

पणजी: माजी मुख्यमंत्री स्व.मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांच्या उमेदवारीवरून महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेत कलगीतुरा रंगला आहे. शिवसेनेचे प्रवक्ते खा.संजय राऊत हे उत्पल यांना पाठिंबा दर्शवत भाजपवर टीका केली. त्यावर आता गोव्याचे भाजपा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Politics in Maharashtra for Utpal Parrikar candidature)

पणजीतून भाजपकडून (Goa BJP) विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी जवळपास निश्‍चित झाली आहे. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल (Utpal Parrikar) हे देखील इच्छूक आहेत. पण, उमेदवारी नाकारून भाजप पर्रीकरांचा अपमान करत असल्याची टीका राऊत यांनी केली. उत्पल हे स्वतंत्र लढणार असतील तर त्यांना पाठिंबा द्यावा, असा प्रस्ताव संजय राऊतांनी तृणमूल काँग्रेस, आप आणि गोवा फॉरवर्ड पार्टी या पक्षांसमोर प्रस्ताव ठेवला. मनोहर पर्रीकर यांच्या सहानुभूतीपोटी बोलल्याचे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

उत्पलला करियर घडवायचे असेल तर..

मनोहर पर्रीकर मोठे नेते होते, त्यांचे कार्य चांगले होते. गोव्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय हेच आम्हाला आमचे कुटुंबिय वाटतात. त्यामुळे उत्पलनेही आमच्या सोबत रहावे असे आम्हाला वाटते. जर उत्पलला आपले राजकीय करियर घडवायचे असेल तर पार्टी नक्कीच त्यांच्या भविष्याचा विचार करेल. मात्र पणजीमध्ये तिकिट देण्याचा निर्णय केंद्रिय समितीचा असणार आहे. भाजपने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा उत्पल आदर करेल असा आशावादही फडणवीस यांनी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

शाळकरी मुलांच्या बाबतीत आपण किती जागरूक, शिक्षित आणि गंभीर आहोत?

विजयनगर साम्राज्य, गोव्याचा संदर्भ; मदुराई आणि कुमार कंपण्णांचा इतिहास याबद्दल जाणून घ्या

Top Most Polluted Countries: जगातील 'हे' 8 देश सर्वाधिक प्रदूषित; क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर!

Goa Politics: दिल्लीत नेमके 'काय' घडले? 'कुणाला' समज, 'कुणाला' आदेश..

SCROLL FOR NEXT