Yuri Alemao Demands CM Pramod Sawant Resignation Dainik Gomantak
गोवा

Goa Politics Bhutani Project: भूतानी प्रकल्पावरुन राजकारण तापलं, ज्येष्ठ नागरिकांचे पाच दिवसापासून उपोषण; आक्रमक आलेमावांनी मागितला मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

Yuri Alemao Demands CM Pramod Sawant Resignation: ‘भूतानी’ प्रकल्पाला दिलेला परवाना मागे घ्यावा यासाठी सांकवाळचे माजी सरपंच प्रेमानंद नाईक मागील काही दिवस आमरण उपोषणाला बसले आहेत.

Manish Jadhav

पणजी: ‘भूतानी’ प्रकल्पाला दिलेला परवाना मागे घ्यावा यासाठी सांकवाळचे माजी सरपंच प्रेमानंद नाईक मागील काही दिवस आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र या सरकारला लोकांची काळजी नसल्याने त्यांनी उपोषण मागे घ्यावे अशी विनंती विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.

नाईकांच्या उपोषणाचा पाचवा दिवस!

‘‘भूतानी प्रकल्पाविरोधात नाईक यांच्या उपोषणाचा आज (25 ऑक्टोबर) पाचवा दिवस आहे. एक ज्येष्ठ नागरिक उपोषणाला बसले असून त्याची सुद्धा पर्वा या बेजबाबदार सरकारला नाही. भाजप सरकार स्वताच्या र्निणयावर ठाम असल्याचे यावरु दिसून येत आहे,’’ असेही आलेमाव म्हणाले. आलेमाव यांनी नाईक यांना आरोग्याच्या कारणास्तव उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले असून एकजुटीने लढा देण्याचे आश्वासन दिले.

आलेमाव यांचा घणाघात

‘‘भाजप सरकारमधील मंत्री आणि आमदार जाड कातडीचे झाले आहेत, त्यामुळे त्यांना सर्वसामान्यांच्या जीवाची किंमत राहिलेली नाही. प्रेमानंद नाईक यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घ्यावे,’’ अशी विनंती आलेमाव यांनी केली.

विनाशकारी प्रकल्प

गोव्याच्या पर्यावरणाचे विनाश करणाऱ्या प्रकल्पांविरोधातील लढाईत आपण सर्व जण एकवटले आहोत, असे काँग्रेस नेते युरी आलेमाव म्हणाले.

मंत्र्यांची भूतानींशी हातमिळवणी

भूतानीच्या प्रकल्पावर बोलताना आलेमाव म्हणाले की, सरकारमधील मंत्र्यांचे भूतानींशी हातमिळवणी आहे आणि त्यांची कृती याचा पुरावा आहे. काही आठवड्यांपूर्वी बदली झालेले सचिव पुन्हा त्याच पंचायतीत परततात. असे का? बीडीओमध्ये अनेक सचिव कुठल्याच पंचायतीचा ताबा नसतना बसलेले आहेत. असे असताना त्याच सचिवांना परत का आणले जाते?,’’ असा सवाल देखील आलेमाव यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी धाडस दाखवावं

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 'भूतानी मेगाप्रोजेक्टशी आपला संबंध नाही' असे विधान केले होते, यावर बोलताना युरी आलेमाव यांनी ज्यांचे संबंध आहेत त्यांची नावे उघड करण्याचे धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखवावे असे म्हटले. ‘‘आपल्या विभागाकडून परवानग्या दिल्या जात नाहीत, असे मुख्यमंत्री कसे म्हणू शकतात? त्यांच्या विभागात काय चालले आहे हे माहित नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असे आलेमाव म्हणाले. एवढ्यावरच न थांबता आलेमाव यांनी या प्रकल्पाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. उच्चस्तरीय चौकशीतूनच या व्यवहारात सहभागी असलेल्या आणि लाच घेतलेल्या लोकांचा पर्दाफाश होऊ शकतो, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

Ahmedabad Lawyer Scam: 'थेरपिस्ट' सोबतची गोवा ट्रीप ठरली 'हनिट्रॅप'

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

SCROLL FOR NEXT