भारतीय जनता पक्षाचे आमदार रमेश तवडकर यांची आज गोवा विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली, त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा आरामात पराभव केला. तवडकर यांना 24 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार नुवेमचे आमदार अलेक्सो सिक्वेरा यांना 15 मते मिळाली. तवडकर यांच्या निवडीमुळे गोव्याला अनुसूचित जमाती प्रवर्गातून पहिला सभापती मिळाला आहे.
विधानसभेत 20 जागा असलेल्या भाजपला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाकडून (MGP) दोन आणि अपक्षांची तीन मते मिळाली, तर काँग्रेसच्या उमेदवाराला त्यांच्याशिवाय आम आदमी पार्टी (AAP), गोवा फॉरवर्ड पार्टी आणि रिव्होल्युशनरी गोवान्स पार्टीचा पाठिंबा मिळाला. (Political Journey of Ramesh Tawadkar from MLA to Speaker)
तवडकर हे माजी मंत्री आणि भाजपच्या (BJP) अनुसूचित जमाती मोर्चाचे नेते आहेत. ते काणकोण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आणि या वर्षी सलग तिसऱ्यांदा निवडून आले. यापूर्वी ते 2007 आणि 2012 मध्ये गोवा विधानसभेवर निवडून आले होते. यापूर्वी, तवडकर यांनी 2012 ते 2017 दरम्यान कृषी, क्रीडा आणि आदिवासी मंत्री म्हणून काम पाहिले होते.
निवडणुकीनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि माजी मुख्यमंत्री (CM) आणि काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत यांनी तवडकर यांना अध्यक्षस्थानी नेले.
तवडकर यांनी सभापतीपदी (Speaker) निवड झाल्यानंतर सदस्यांचे आभार व्यक्त केले आणि गोव्यातील आदिवासी लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अनेक लोकांचे सहकार्य मिळण्याचे भाग्य मला लाभले आहे. ज्यांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे त्यांनी आपल्या समाजाचा आणि आपल्या मतदारसंघाचाही सन्मान केला असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसचे (Congress) उमेदवारांनी ही तवडकर यांचे अभिनंदन केले. एमजीपीचे नेते रामकृष्ण उर्फ सुदिन ढवळीकर यांनी तवडकरांचे वर्णन ‘भूमिपुत्र' असे केले.
40 सदस्यीय गोवा विधानसभेत भाजपने 20 जागा जिंकल्या, काँग्रेस 11, एमजीपी आणि आपने प्रत्येकी दोन, जीएफपी आणि आरजीपीला प्रत्येकी एक तर अपक्षांना तीन जागा मिळाल्या. दोन एमजीपी आणि तीन अपक्षांच्या पाठिंब्याने भाजपला गोवा विधानसभेत आरामदायी बहुमत मिळाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.