Sonali Phogat Dainik Gomantak
गोवा

Sonali Phogat Case|सोनाली फोगट मृत्यू प्रकरणात राजकीय हस्तक्षेप! कुटुंबाचा आरोप

सोनाली फोगट मृत्यू प्रकरण : सांगवानने दिली गुन्ह्याची कबुली

दैनिक गोमन्तक

पणजी: देशभर गाजत असलेले भाजप नेत्या सोनाली फोगट मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित सुधीर सांगवान याने आपणच कट रचून सोनाली फोगट यांची हत्या केल्याची कबुली गोवा पोलिसांसमोर दिल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, सुधीर तपास कार्यात सहकार्य करत नसून पोलिसांची वारंवार दिशाभूल करत असल्याचे सांगण्यात आले. गोव्यात कोणत्याच प्रकारचे शुटिंग नसताना शुटिंगच्या नावावर सुधीर सांगवान याने आपला मित्र सुखविंदरसह सोनाली यांच्या हत्येचा कट रचून तो पूर्णत्वास नेला. हा कट गेल्या तीन महिन्यांपासून तो रचत होता. या कारस्थानासाठीच त्याने गोव्याची निवड केली.

(Political interference in Goa Sonali Phogat death case Accusation of the family)

पार्टीमध्ये ड्रग्स देऊन सोनाली यांना मरण्यासाठीच टॉयलेटमध्ये सोडले असल्याचे आतापर्यंतच्या तपासात स्पष्ट झाले आहे. ड्रग्स देऊन नैसर्गिक मृत्यू झाला, असे दाखवण्याचा सुधीरचा डाव होता आणि यासाठीच सोनाली यांना शुटिंगच्या नावाखाली गुडगाव येथून गोव्यात आणले होते, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा

या प्रकरणात सर्वांत महत्त्वाचा पुरावा सोनाली यांचा व्हिसेरा असणार आहे. त्यातून सोनाली यांना पाजलेल्या ड्रग्सचा तपशील मिळणार आहे. याशिवाय मृत्यूचे नेमके कारणही स्पष्ट होणार आहे. सुरवातीला हा व्हिसेरा हैदराबाद आणि मुंबईला पाठवण्यात येणार होता. मात्र, तेथील अहवाल लवकर मिळण्याची शक्यता नसल्याने तो व्हिसेरा चंदीगड येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला आहे. हा अहवाल आल्यानंतर प्रकरणाची उलगडा होण्याची शक्यता आहे.

"गोवा पोलिस योग्य तपास करत नाहीत मला वाटते की यामागे राजकीय प्रभाव आहे, म्हणून आता आम्ही केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) चौकशीची मागणी करण्यासाठी गोवा उच्च न्यायालयात जाऊ: विकास सिंघमार, सोनाली फोगटचा पुतण्या

सोनाली यांचे लॉकर उघडण्यासाठी सांगवान याच्याकडे पोलिसांनी विचारणा केली असता, त्याने दोन्ही वेळेला लॉकरचे चुकीचे क्रमांक दिले. त्यामुळे पोलिसांना ते उघडता आले नाहीत. शेवटी गोवा पोलिसांनी हिस्सारमधील ते लॉकर सील केले आहे. कदाचित या लॉकरमधूनही काही धागेदोरे हाती लागण्याच्या भीतीने त्याने ही लपवाछपवी केली असल्याचा अंदाज आहे.

गोवा पोलिसांचे एक पथक सध्या हरियाणा राज्यातील हिस्सार येथे असून ते साक्षी-पुराव्यासाठी विविध प्रकारची माहिती गोळा करत आहेत. याचाच भाग म्हणून पोलिसांनी फार्म हाऊसची कसून झडती घेऊन काही पुरावे गोळा केले आहेत. यात काही डायऱ्यांचाही समावेश आहे. शिवाय सीसीटीव्ही फुटेज रिकव्हर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

शिवमचीही स्वतंत्र चौकशी

याप्रकरणी हिस्सार पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शिवमचीही स्वतंत्र चौकशीही पोलिसांनी केल्याची माहिती मिळाली आहे. सांगवान हाच सोनाली फोगट यांचे सर्व आर्थिक व्यवहार पाहात होता, हे स्पष्ट झाले असून सोनाली यांच्या मृत्यूमागे आर्थिक हव्यास हे एक कारण असले तरी अन्य काही कारणेही पोलिस शोधत आहेत.

गुडगाव, गुरुग्राम रोहतकमध्ये चौकशी

या प्रकरणाच्या चौकशीसाठी गोवा पोलिसांचे एक पथक हरियाणा राज्यातील हिस्सारमध्ये तळ ठोकून आहे. फोगट यांचे आर्थिक व्यवहार, देवाण-घेवाण, नातेवाईक-कार्यकर्ते यांच्याशी असलेले संबंध यांची माहिती ते मिळवत आहेत. त्याशिवाय सोनाली यांची एसबीआय आणि आयसीआयसीआय बँकेतील खात्यांची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी अर्ज केला आहे. हे पथक गुडगाव, गुरुग्राम रोहतकमध्ये चौकशीसाठी जाणार असून सांगवानच्या घराचीही झडती घेणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Robbery Incident: सराफा दुकानाचे शटर फोडले, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, पण पोलिसांच्या 'सतर्कते'मुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला; चावडी बाजारात मध्‍यरात्री थरार!

Horoscope: नवीन संधी येऊ शकते, महत्त्वाच्या निर्णयात संयम हवा! वाचा तुमच्या राशीचे भविष्य

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

SCROLL FOR NEXT