Crime News  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: पीडितेने साक्ष फिरवली, संशयिताची निर्दोष मुक्तता

Goa Crime: विवाह केल्याचा पुरावा नाही त्यामुळे संशयाचा फायदा देऊन निर्दोष ठरवण्यात येत असल्याचे निरीक्षण

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: बलात्कारप्रकरणातील पीडितेने संशयिताविरुद्ध जबानी फिरवल्याने पोक्सो न्यायालयाने आयआरबी पोलिस असलेल्या संशयित प्रितम कदम याची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयासमोर असलेल्या दस्तावेजानुसार पीडित व संशयित यांचे संबंध होते. पीडितेने संशयिताबरोबर विवाह केल्याचा कोणताच पुरावा नाही. त्यामुळे संशयाचा फायदा देऊन त्याला निर्दोष ठरवण्यात येत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने केले आहे.

संशयित प्रितम कदम हा विवाहित असताना त्याने पीडितेशी सावंतवाडी येथे जाऊन विवाह केला व त्यानंतर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली होती. पीडित तरुणी ही समुद्रकिनाऱ्यावर वस्तू विकायची तर पोलिस कॉन्स्टेबल असलेला संशयित तेथील समुद्रकिनाऱ्यावर ड्युटीला होता. २०१३ पासून ते दोघे एकमेकाला ओळखत होते. याप्रकरणी पोलिसानी संशयिताला ४ जून २०१६ रोजी अटक करून गुन्हा दाखल केला होता.

त्याने पीडितेला त्याचा विवाह झाला असल्याचे न सांगता तिची फसवणूक केली. मात्र पीडितेने न्यायालयात दिलेल्या जबानीत संशयिताविरुद्ध कोणतेच आरोप केले नाहीत. तिने ही तक्रार का दाखल केली, याचे कारणही दिलेले नाही. तिला हे प्रकरण पुढे न्यायचे नाही. हे प्रकरण मागे घेण्यासाठी कोणाकडूनच आपल्यावर दबाव आणला गेला नाही, असे न्यायालयातील सुनावणीवेळी स्पष्ट केले होते.

विवाहाचा पुरावाच नाही!

संशयिताने पीडित तरुणीबरोबर विवाह करून तो भाड्याच्या खोलीत राहत असल्याचा पुरावाही सिद्ध झालेला नाही. त्याने विवाह केल्याचा विवाहनोंदणी प्रमाणपत्र पोलिसांना सापडले नाही. तिची न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबानी नोंदवण्यात आली होती, मात्र त्यातही तिने संशयिताविरुद्ध आरोप केलेले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ST Reservation: गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाचे डोळे दिल्लीकडे, गोव्यात आरक्षणाचा सर्वात मोठा सस्पेन्स; अमित शहा आठवडाभरात भूमिका करणार स्पष्ट?

Coal Exchange Rules 2026: मुरगाव बंदराबाबत सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे कोळसा व्यापाराला मिळणार गती

Diksha Parwadkar Accident: दीक्षा पारवडकर मृत्यू प्रकरणात नवा खळबळजनक ट्विस्ट! परवाना निलंबित तरीही गोव्यात आलिशान गाड्यांची विक्री सुरुच!

PM Surya Ghar Yojana Goa: गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! चिखली पंचायत क्षेत्रातील दाबोळी बनला आदर्श सौरऊर्जा गाव; केंद्राकडून मिळणार 1 कोटींचे अनुदान

Goa Crime: धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला, पण पुरावेच गायब? ‘मोयरा बार’ हाणामारी प्रकरणातील सहाही संशयितांची निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT