Rumdamol-Davorlim Dainik Gomantak
गोवा

Rumdamol-Davorlim: रुमडामळमध्ये पोलिसांची करडी नजर; सहा ठिकाणी पोलिस गस्त

धार्मिक कलहात यापूर्वी कित्येकवेळा पोळून निघालेल्या रुमडामळ-दवर्ली या भागाला पुन्‍हा त्‍याची झळ बसू नये, यासाठी दक्षिण गोवा पोलिसांनी पूर्ण खबरदारी घेतली असून या भागातील सहा संवेदनशील भागात पोलीस गस्‍त चालूच ठेवली आहे.

दैनिक गोमन्तक

Rumdamol-Davorlim: धार्मिक कलहात यापूर्वी कित्येकवेळा पोळून निघालेल्या रुमडामळ-दवर्ली या भागाला पुन्‍हा त्‍याची झळ बसू नये, यासाठी दक्षिण गोवा पोलिसांनी पूर्ण खबरदारी घेतली असून या भागातील सहा संवेदनशील भागात पोलीस गस्‍त चालूच ठेवली आहे.

हाऊसिंग बोर्ड पोलीस चौकीवरही अधिक कुमक ठेवण्‍यात आली आहे. सध्‍या जरी रुमडामळ शांत असले, तरी केव्‍हाही हा कलह पुन्‍हा निर्माण होऊ शकतो, याची पूर्ण कल्‍पना असल्‍याने पोलिसांनी ही खबरदारी घेतली आहे.

मडगावचे पोलीस उपअधिक्षक संतोष देसाई यांनी आज या भागातील मुस्‍लीम समाजातील नेत्‍यांना बोलावून घेऊन त्‍यांनी शांतता राखण्‍यास पोलिसांना सहकार्य करावे, अशी मागणी केली. पंचसदस्‍य समिउल्‍ला फणिबंद व अन्‍य नेते उपस्‍थित होते. काल देसाई यांनी या भागातील हिंदू नेत्‍यांना बोलावून घेऊन त्‍यांनाही तसेच आवाहन केले होते.

शनिवारी रात्री विनायक वळवईकर यांच्‍यावर सुरीहल्‍ला करण्‍याचा प्रयत्‍न झाल्‍यावर या भागातील वातावरण चिघळले होते. रविवारी हिंदुत्‍ववादी संघटनांच्‍या कार्यकर्त्यांनी या भागात मोर्चा काढल्‍याने या प्रकरणाला धार्मिक वळण लागण्याची शक्‍यता निर्माण झाली होती.

पंचवीस पोलिस तैनात

उपअधिक्षक देसाई यांच्‍याशी संपर्क साधला असता, दोन्‍ही गटांतील नेत्‍यांनी शांतता राखण्‍याचे आश्‍वासन पोलिसांना दिले आहे. या घटनेच्‍या मुळापर्यंत जाऊन पोलीस तपास करत आहेत. असे जरी असले तरी सुरक्षेचा उपाय म्‍हणून आम्‍ही वेगवेगळ्‍या पोलीस पहारा व पोलीस गस्‍त घालणे सुरुच ठेवले आहे. एका पाळीत किमान २५ पोलीस या भागात कार्यरत असतात. सध्‍या उपनिरीक्षक प्रशांत भगत यांना या भागात तैनात करण्‍यात आले असल्‍याची माहिती त्‍यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT