गोव्यात तृणमूल काँग्रेस (TMC) साठी रणनीती आखणाऱ्या प्रशांत किशोर यांच्या I-PAC संस्थेच्या गोव्यातील कामाच्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. कारवाईदरम्यान, पोलिसांनी प्रशांत किशोर यांच्या कंपनीच्या कर्मचाऱ्याला पर्वरी शहरातून अटक केली. (Prashant Kishor TMC News)
आरोपीकडून गांजा (अमंली पदार्थ) जप्त करण्यात आला आहे. गोवा पोलिसांनी शुक्रवारी पर्वरीमधील अनेक बंगल्यांवर छापे टाकले. येथे I-PAC ने 8 बंगले भाड्याने घेतले आहेत. अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे वय 28 आहे. पोलिसांनी त्याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
गोव्यात 14 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. गेल्या अडीच वर्षांपासून तृणमूल कॉंग्रेससाठी (TMC) रणनीती तयार करणारे प्रशांत किशोर गोव्यात पक्षाचे काम सांभाळत आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी प्रशांत आणि तृणमूल काँग्रेसमधील संबंध बिघडल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
पश्चिम बंगालमधील (West Bengal) तृणमूल काँग्रेसने निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) आणि त्यांचा I-PAC संस्थेसोबतचा करार संपवण्याच्या चर्चेला सुरुवात केली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या तिकीट वाटपावरून गोंधळ झाला आहे. या पार्श्वभूमीवर करार संपवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समोर येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.