Calangute Crime Dainik Gomantak
गोवा

Calangute Crime: कळंगुट येथे पोलिसांची मोहिम; एकाच दिवसात ताब्यात घेतले 34 दलाल

31 मे पासून पोलिस राबवताहेत मोहिम

Akshay Nirmale

Calangute Crime: कळंगुट पोलिसांनी शनिवारी राबवलेल्या मोहिमेत एकूण 34 दलालांना ताब्यात घेतले आहे. हे दलाल पर्यटकांना हेरून त्यांना विविध आमिषे दाखवून पर्यटकांची लूट करत असल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे अशा कृत्यांना पायबंद बसावा यासाठी पोलिसांकडून वरचेवर अशा मोहिमा राबवल्या जात असतात. त्याच क्रमात शनिवारी देखील पोलिसांनी कळंगुट-बागा परिसरात मोहिम राबवली. यावेळी एकूण 34 दलालांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गोव्यात होत असलेल्या विविध राष्ट्रीय, आंतरष्ट्रीय बैठका कार्यक्रमांच्या पार्श्वभुमीवर गोवा पोलिसांकडून सतर्कता बाळगली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून या बैठकांच्या काळात कोणतेही गैरकृत्य, गुन्हा घडू नये यासाठी पोलिस शोधमोहिम राबवत आहेत.

आताही 31 मे पासून पोलिसांनी कळंगुट-बागा परिसरात दलालांविरोधात मोहिम राबवली होती. दरम्यान, 3 जून रोजी पोलिसांनी कळंगुटे येथे अचानक मोहिम राबवून एकाच दिवसात 34 दलालांना ताब्यात घेतले आहे.

पर्वरीची एसडीपीओ यांच्या निगराणीखाली ही मोहिम राबविण्यात आली. या दलालांकडून प्रवाशांना लुटण्याच्या घडतात. त्या पार्श्वभुमीवर पोलिसांकडून अशी कारवाई केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT