Bangladeshi in Goa Dainik Gomantak
गोवा

Bangladeshi in Goa : बार्देशात बांगलादेशींची कसून चौकशी

बागा येथे दोघे ताब्‍यात; किनारपट्टी परिसर पोलिसांनी काढला पिंजून

गोमन्तक डिजिटल टीम

Bangladeshi in Goa : ‘पीएफआय’वरील बंदीनंतर बार्देशातील कळंगुट, हणजूण तसेच अन्‍य भागांतील पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. या परिसरात वास्तव्य करून राहणाऱ्या बांगलादेशी लोकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्‍यान, बागा येथून परवीन बेगम (40) व मोहम्मद अल अमीन (18) यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक दत्तगुरु सावंत यांनी दिली.

कळंगुट पोलिस कक्षेत येणारा सिकेरीपासून बागा तर हणजूण पोलिस हद्दीत येणाऱ्या हणजूण, वागातोर तसेच शापोरा मच्छीमार जेटीपर्यंतचा परिसर पोलिसांनी बुधवारी विशेष पथकाच्या मदतीने दिवसभर पिंजून काढला. सोमवारपासून सुरू झालेल्या या कारवाईत अद्याप कुणालाच कायदेशीर अटक करण्यात आलेली नाही, असे हणजूणचे पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई व कळंगुटचे पोलिस निरीक्षक दत्तगुरु सावंत यांनी सांगितले.

शाळांनी जारी केला महत्त्‍वपूर्ण आदेश

मुलांना पळविणारी टोळी सक्रिय झाल्याच्या वृत्ताने कळंगुट तसेच शिवोली मतदारसंघातील बहुतांक शाळांनी खबरदारीचा उपाय म्हणून शाळा सुटल्यावर मुलांना पालकांशिवाय अन्य नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यास मनाई करण्याचा आदेश जारी केला आहे. बालरथमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही त्‍यांना घरी सोडतेवेळी विशेष नियमावली जारी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही संशयास्‍पद हालचाली आढळल्‍यास त्वरित जवळच्या पोलिस स्थानकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT