Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: हणजूण येथे जबरदस्ती घर बळकावण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्काळ कारवाईने टळला धोका, संशयितांवर गुन्हा नोंद

Anjuna Home Grab Case: काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी त्यांच्या मोलकरणीला धाक दाखवून जबरदस्तीने घराचा ताबा घेतल्याची तक्रार सिनारी-ब्रॉनव्हीन यांच्याकडून हणजूण पोलिसांत दाखल केली.

Sameer Panditrao

कळंगुट: पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने सेंट मायकल वाडा-हणजूण येथे वास्तव्य करून राहणाऱ्या राजेश सिनारी तसेच त्यांची विदेशी पत्नी ब्रॉनव्हीन ऊर्फ बॉनी यांचा घराचा ताबा अबाधित राहिला आहे. दरम्यान, या प्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे.

काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी त्यांच्या मोलकरणीला धाक दाखवून जबरदस्तीने घराचा ताबा घेतल्याची तक्रार सिनारी-ब्रॉनव्हीन यांच्याकडून हणजूण पोलिसांत दाखल केली.

ही घटना शनिवारी दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास घडल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हणजूण पोलिस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व परिस्थितीचा ताबा घेतला. पोलिसांची चाहूल लागताच गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी तेथून पळ काढला.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, सेंट मायकल वाडा-हणजूण येथील कौलारू घरात एक विदेशी नागरिक बरीच वर्षे वास्तव्य करून राहात होता. कालांतराने त्या विदेशी नागरिकाने तेथील घर व जमीन मूळ (गोमंतकीय) मालकाकडून विकत घेतली व तेथेच स्थायिक झाला.

मध्यंतरी, त्या विदेशी नागरिकाच्या संपर्कात ब्रॉनव्हीन ऊर्फ बॉनी ही विदेशी महिला आली व नंतर ते दोघेही संगनमताने त्याच घरात एकत्रित राहू लागले. काही काळानंतर विदेशी नागरिकाने हणजुणेतील आपले घर तसेच घराभोवतीच्या जमिनीचे पूर्ण अधिकार पॉवर ऑफ ॲटर्नीद्वारे जनार्दन खोराटे या दक्षिण भारतीय तरुणाकडे दिले व तो औषधोपचारासाठी आपल्या मूळ गावी विदेशात परतला.

दरम्यानच्या काळात सरकारच्या विविध विभागाकडून घरमालकाला नोटिसा येऊ लागल्याने घर व जमिनीचा मालकी हक्क मिळालेल्या जनार्दन ऊर्फ जॉनी यांनी तेथील घर जमिनीसकट विक्रीस काढले व तेथे वास्तव्य करून राहात असलेल्या ब्रॉनव्हीन तसेच त्यांचा सहकारी राजेश सिनारी यांना घर खाली करण्याचे फर्मान सोडले. दरम्यान, आपणही या घराच्या दुरुस्तीसाठी पैसे खर्च केल्याचा दावा करीत ब्रॉनव्हीन-सिनारी कुटुंबाने राहाते घर सोडण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला.

ते आरोप खोटे व बिनबुडाचे!

सेंट मायकलवाडा, हणजूण येथील घरातून तीस-पस्तीस गुंडांनी आम्हाला बळजबरीने घराबाहेर काढले, असा आरोप राजेश नामक व्यक्तीच्या कुटुंबीयांने पणजीत पत्रकार परिषद घेउन केला होता. याबाबत जनार्दन खोराटे यांनी स्वतःची बाजू मांडत स्पष्टीकरण दिले की, ज्या घराविषयी संबंधितांनी वरील दावे किंवा वक्तव्य केली आहेत, त्यात तथ्य नाही. सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. जनार्दन खोराटे हे यूकेचे रहिवासी असलेल्या मायकल पीटर यांचे कायदेशीर अ‍ॅटर्नी आहेत. असा दावा स्वतः जनार्दन खोराटे यांनी सोमवारी म्हापशात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला. यावेळी या मालमत्तेचे मालक मायकल पीटर यांचे चुलत बंधू यूके नागरिक डॅविड हे उपस्थित होते. मायकल पीटर हे यूके नागरिक असून ते कर्करोगाने पीडित आहेत, अशी माहिती खोरात यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT