Goa Police Dainik Gomantak
गोवा

Illegal liquor रेल्वे पोलिसांची कारवाई! भारतीय बनावटीचा मद्यसाठा वास्को येथुन जप्त

दोन दिवसापुर्वी वास्को रेल्वे स्थानकावर शालिमार एक्स्प्रेसच्या डब्यात लपवून ठेवलेला मोठा मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा: रेल्वे पोलिसांनी वास्को द गामा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म 1 वर गस्त घालत असताना एका व्यक्तीला 27 भारतीय बनावटीच्या दारूच्या बाटल्या अवैधरित्या तस्करी करताना ताब्यात घेतले. एकुण 7200 रुपयेचा हा मुद्देमाल असुन; पुढील तपास सुरू आहे.

(Police intercept one person in illegal possession of 27 Indian made liquor bottles in Vasco )

शालिमार एक्स्प्रेसमधून परराज्यात जाणारा मोठा मद्यसाठा जप्त

दोन दिवसापुर्वी वास्को रेल्वे स्थानकावर शालिमार एक्स्प्रेसच्या डब्यात लपवून ठेवलेला मोठा मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. 14,550 रुपयांची देशी-विदेशी बनावटीची दारू वास्को रेल्वे पोलिसांनी मंगळवारी सकाळी जप्त केली. मात्र हा मद्यसाठा ट्रेनमध्ये कुणी ठेवला याची माहिती अजूनही मिळू शकली नाही.

पोलीस उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार वास्को रेल्वे पोलीस रेल्वे स्थानकावर गस्त घालत असताना रेल्वे पोलिसांना दोन हँडबॅग आणि एक ट्रॉली बॅग शालिमार एक्सप्रेस पॅसेंजर ट्रेनच्या डब्यात टाकून दिलेल्या निदर्शनास आल्या. ही ट्रेन वास्को रेल्वे स्थानकातून पश्चिम बंगालकडे निघणार होती. मंगळवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी या बॅगांची झडती घेतली ज्यात मोठा मद्यसाठा आढळून आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT