Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: माशेल येथे मध्यवर्ती परिसरात पोलिसांची गुंडगिरी!

Goa Police: माशेल येथे मध्यवर्ती परिसरात असलेल्या फास्ट-फूड चालकाला काल मध्यरात्री बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला. या प्रकरणात तीन पोलिसांसह एकूण आठ जणांविरोधात म्हार्दोळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Police: माशेल येथे मध्यवर्ती परिसरात असलेल्या फास्ट-फूड चालकाला काल मध्यरात्री बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला. या प्रकरणात तीन पोलिसांसह एकूण आठ जणांविरोधात म्हार्दोळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्‍यान, फोंडा पोलिस स्थानकातील हेडकॉन्स्टेबल समीर फडते याच्‍यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते.

माशेल येथे फास्ट फूड दुकान चालवणाऱ्या विराज माशेलकर याला बेदम मारहाण करण्यात आली. त्‍याच्‍या फास्ट फूड दुकानातील किचनमध्ये घुसून पाच जणांनी त्याच्यावर हल्ला केला. तिघेजण दुकानाच्या बाहेर थांबले होते.

हेडकॉन्स्टेबल समीर फडते, अंमलीपदार्थविरोधी पक्षकातील कॉन्स्टेबल आकाश नावेलकर व आयआरबी कॉन्स्टेबल मितेश गाड, त्‍याचा भाऊ मोहित गाड व अन्य एक सुप्रेश अशा पाच जणांनी विराजला मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मारहाण करून सर्वजण पळून गेले.

त्यानंतर जखमी विराजला इस्पितळात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी आज सोमवारी विराज माशेलकर याने म्हार्दोळ पोलिस स्थानकात या सर्वांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पळून गेलेल्यांपैकी एकाला पकडले असून निरीक्षक राघोबा कामत अधिक तपास करीत आहेत.

समीरची बायको होती बिझनेस पार्टनर

माशेल येथील या फास्ट फूड व्यवसायात पोलिस असलेल्या समीर फडते याची बायको पार्टनर होती. विराज व समीर हे दोघेही मित्र. विराज नोकरी करायचा व रात्री फास्ट फूडवर येऊन काम पहायचा. तोपर्यंत समीरची बायको दुकान सांभाळायची. कोविड काळात विराजची नोकरी गेल्यानंतर त्याने समीरच्या बायकोला पार्टनरशिपमधून मुक्त केले व आपण पूर्णवेळ फास्ट फूड चालवू लागला. त्याचा राग समीरला होता.

शिवाय रात्री अकरानंतर दुकान सुरू ठेवण्यामुळे तो आपल्याकडून पैसे मागत होता, असे विराज माशेलकरने सांगितले. त्यातूनच हा मारहाणीचा प्रकार घडल्याचे विराजने स्पष्ट केले आहे.

पोलिस स्थानकात सातवेळा तक्रारी

समीर फडते आपल्याला कायम धमकावत असल्याची तक्रार विराज माशेलकर याने फोंडा व म्हार्दोळ पोलिस स्थानकात तब्‍बल सातवेळा केली. पण पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. आता या प्रकरणात समीर फडते हा निलंबित झाला असून आकाश नावेलकर याला ताब्यात घेण्यात आले आहे. समीरसह अन्य सात जणांचा शोध म्हार्दोळ पोलिस घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

Ahmedabad Lawyer Scam: 'थेरपिस्ट' सोबतची गोवा ट्रीप ठरली 'हनिट्रॅप'

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT