Colvale jail
Colvale jail  Dainik Gomantak
गोवा

Colvale Jail: कोलवाळ कारागृहात पोलिसांचा आठवड्यात दुसऱ्यांदा छापा; 8 मोबाईल फोन जप्त

Akshay Nirmale

Colvale Jail: तुरूंग महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी पुन्हा कोलवाळ कारागृहात छापा टाकण्यात आला. या आकस्मिक केलेल्या तपासणीत कैद्यांकडून 8 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

दरम्यान, या कारागृहातील छाप्याची आणि तिथे मोबाईल फोन आढळून आल्याची ही आठवडाभरातील दुसरी घटना आहे. या छाप्यात मोबाईल फोन्स, ब्लुटुथ हेडसेट, इंडक्शन कुकटॉप, अमली पदार्थ, तंबाखू असे साहित्य या छाप्यात आढळून आले आहे.

गेल्या आठवड्यातही असाच प्रकार आढळून आला होता. तसेच गेल्या महिन्यातही असाच प्रकार समोर आला होता. आकस्मिकपणे तुरुंग अधिकाऱ्यांनी घातलेल्या छाप्यात 45 मोबाईल्स, चार्जर आणि ड्रग्ज गेल्या महिन्यात सापडले होते.

कारागृहात प्रवेश करणाऱ्या कैदी, कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येत असली तरी या ठिकाणी बॅगेज स्कॅनर नाही. बॅगेज स्कॅनरसाठीचा प्रस्ताव सरकार दरबारी पडून आहे. कारागृहात धान्य व कडधान्यातून हे मोबाईल आत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुरुंग कर्मचारी व कैद्यांचे नेटवर्क असल्याने ते आतपर्यंत पोहोचत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election : विकसित भारतासाठी मतदान करा! मुख्यमंत्री सावंत

Goa News : तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही त्यांनी सामान्यांसाठी काय केले? मुख्यमंत्री सावंत

Pernem News : भाजप सरकार हे सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी; खलपांना लोकसभेत पाठवा

Loksabha Election 2024 : काणकोणवासीयांनी पल्लवींना पाठबळ द्यावे : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Mapusa Amit Shah Meeting : भाऊंसाठी आज ‘शाही’ सभा; म्‍हापशात जय्‍यत तयारी

SCROLL FOR NEXT