पणजी: पंचायत निवडणुका लागू झाल्यापासून पोलीस आणि अबकारी खात्याने २६ ठिकाणी छापेमारी करत 8 लाख 12 हजार 725 रुपयांची दारू जप्त केली आहे. यातील सर्वात मोठी कारवाई तिसवाडी तालुक्यात केली असून 6 लाख 9 हजार 496रुपयांची दारू जप्त केली आहे.
(Police, excise raided 26 places in goa state)
राज्यात पंचायत निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलीस आणि अबकारी खात्याच्या वतीने बेकायदेशीर रित्या साठवलेल्या दारू साठ्यांवर छापेमारी करत 8 लाख 12 हजार 725 रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त केली आहे.
अबकारी खात्याकडून 19 ठिकाणी छापेमारी
पंचायत निवडणुका जाहीर झाल्यापासून 8 ऑगस्टपर्यंत अबकारी खात्याने 19 ठिकाणी छापे टाकत 1 लाख 49 हजार 891 रुपये किमतीची कंट्री लीकर, बियर, इंडियन मेड फॉरेन लीकर जप्त केली. काणकोण येथे सर्वाधिक 4 मुरगाव आणि सासष्टी येथे प्रत्येकी 3 तर सांगे येथे 1 तर बार्देश येथे 4 पेडणेत 3 आणि तिसवाडी येथे 1 ठिकाणी कारवाई करण्यात आली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.