Goa Recruitment Fraud  Canva
गोवा

Cash For Job: ऑडिओ टेपप्रकरणी गोवा पोलिसांची आमदारांना क्लिनचीट, प्रकरण हायकोर्टात जाणार?

Goa Crime: ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांच्‍या विरोधात सामाजिक कार्यकर्ते सुदीप ताम्‍हणकर यांनी कुळे पोलिस स्‍थानकात जी तक्रार दाखल केली होती, त्‍यात दखलपात्र असा कुठलाही गुन्‍हा आढळून न आल्‍याने ती फेटाळल्‍याचे पोलिसांनी कळविल्‍यामुळे हा विषय पुन्‍हा एकदा चर्चेत आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Cash For Job Ganesh Gaonkar Audio Tape

मडगाव: ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांच्‍या विरोधात सामाजिक कार्यकर्ते सुदीप ताम्‍हणकर यांनी कुळे पोलिस स्‍थानकात जी तक्रार दाखल केली होती, त्‍यात दखलपात्र असा कुठलाही गुन्‍हा आढळून न आल्‍याने ती फेटाळल्‍याचे पोलिसांनी कळविल्‍यामुळे हा विषय पुन्‍हा एकदा चर्चेत आला आहे.

पोलिसांच्‍या या भूमिकेला आपण न्‍यायालयात आव्‍हान देणार, अशी प्रतिक्रिया तक्रारदार ताम्‍हणकर यांनी व्‍यक्‍त केली आहे. सध्‍या गोव्‍यात वेगवेगळ्‍या प्रकारचे ‘कॅश फॉर जाॅब’ घोटाळे उघडकीस आले असतानाच त्‍यात राजकारण्‍यांचा कथित सहभाग, हा चर्चेचा विषय बनला आहे. ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात खरेच राजकारण्‍यांचा हात आहे का आणि जर हात असेल तर पोलिस त्‍यांच्‍यापर्यंत का पोहोचत नाहीत, या चर्चेने पुन्‍हा एकदा जोर धरला आहे.

यापूर्वी दक्षिण गाेव्‍याच्‍या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात आतापर्यंत कुठल्‍याही राजकारण्‍याचे नाव पुढे आलेले नाही, असा खुलासा केला होता. यासंदर्भात राजकीय विश्‍लेषक क्‍लिओफात आल्‍मेदा कुतिन्‍हो म्‍हणाले की, ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्यांची व्‍याप्‍ती पाहिल्‍यास सत्तेत असलेल्‍या मोठ्या व्‍यक्‍तीचा हात असल्‍याशिवाय एवढे माेठे घाेटाळे होऊच शकत नाही, असे वाटते. मात्र, आता सत्तेत असलेले हे कदाचित मंत्री असू शकतात किंवा सनदी अधिकारीही.

न्यायाधीशांच्या अधिकारिणीकडून चौकशी व्हावी!

अशा घोटाळ्यात कुठल्‍याही सत्ताधारी पक्षातील राजकारण्‍यांचा हात असल्‍यास पोलिस निश्‍चितच ते रेकॉर्डवर आणणार नाहीत. त्यामुळे या घाेटाळ्‍याची चौकशी न्‍यायाधीशांच्‍या अखत्‍यारितील त्रयस्‍थ अधिकारिणीकडून हाेण्‍याची गरज आहे, असे क्‍लिओफात आल्‍मेदा कुतिन्‍हो म्‍हणाले.

राजकीय नेत्यांना पाठीशी घातले : ताम्हणकर

यासंदर्भात ताम्‍हणकर यांच्‍याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कुळे पोलिसांची ही कृती म्‍हणजे, राजकारण्‍यांना पाठीशी घालण्‍याचा प्रकार आहे. ऑडिओसारखा महत्त्वपूर्ण पुरावा असतानाही जर पोलिस या प्रकरणात दखलपात्र गुन्‍हा नसल्‍याचा दावा करत असतील तर आतापर्यंत ज्‍या कुणाला ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात अटक केली, तीही प्रकरणे अशाच प्रकारची असल्‍याने त्‍यांच्‍या विरोधातही दखलपात्र असे काही नाही असे समजायचे का, असा सवाल करून या निर्णयाच्‍या विरोधात न्‍यायालयात दाद मागू, असे त्‍यांनी सांगितले.

आमदार गावकरांशी संपर्क होईना

याप्रकरणी आमदार गणेश गावकर यांची प्रतिक्रिया घेण्‍यासाठी त्‍यांना फोन केला असता ते ‘आऊट ऑफ रेंज’ असल्‍यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

पत्रात काय म्हटले?

गोव्‍यात ‘कॅश फॉर जॉब’ची प्रकरणे गाजत असतानाच सोशल मीडियावर एक ऑडिओ व्‍हायरल झाला होता. त्‍यात जो आवाज ऐकू येत होता, तो आमदार गणेश गावकर यांच्‍या आवाजाशी साम्‍य असणारा होता. या ऑडिओत ती व्‍यक्‍ती कुणा एका ‘मोन्‍सेरात’ला तुझ्‍यासाठी नोकरी मिळवून देण्‍यासाठी सहा लाख रुपये दिले, असे ऐकू येत होते. या ऑडिओचा हवाला देत ताम्‍हणकर यांनी आमदार गावकर यांच्‍या विरोधात तक्रार दिली होती. मात्र, या प्रकारात दखलपात्र गुन्‍हा आढळून आलेला नाही, असे सूचित करणारे पत्र पोलिसांनी ताम्‍हणकर यांना पाठविले.

गोव्‍यात सध्‍या जे काही सुरू आहे, ते पाहिल्‍यास सामान्‍य लोकांचा पोलिस आणि प्रशासनावरील विश्‍वास उडाला आहे. हे पाेलिस काहीच करू शकणार नाहीत, अशा प्रकारचे समाजमत बनू लागले आहे आणि माझ्‍या मते हेच अधिक धाेकादायक आहे.
क्‍लिओफात आल्‍मेदा कुतिन्‍हो, राजकीय विश्‍लेषक
सत्ताधारी पक्षातील कुठल्‍याही राजकारण्‍याचा या घाेटाळ्‍यात हात नाही, तर या प्रकरणांची न्‍यायालयीन चौकशी व्‍हावी अशी आम्‍ही मागणी करत आहोत, ती मागणी सरकार का मान्‍य करत नाही? यावरूनच यात काहीतरी काळेबेरे आहे, हे उघड होते.
ॲड. अमित पालेकर, गोवा राज्य संयोजक, ‘आप’
गोव्‍यात जे ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळे उघडकीस आले आहेत, त्‍यात कुणाचा हात आणि त्‍यांना कुणाचा आशीर्वाद आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्‍यामुळे हे सरकार दुसरी प्रकरणे पुढे आणून या घाेटाळ्यांपासून लोकांचे लक्ष भलतीकडे वळवू पाहात आहे.
विजय सरदेसाई, अध्‍यक्ष, गोवा फॉरवर्ड

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT