Mahesh Konadkar Mandrem Assault Case Canva
गोवा

Mandrem Crime: राजकीय विषय नाहीच! माजी सरपंच हल्लाप्रकरण उलगडले, 'जमीन विक्री' व्यवहाराची पार्श्वभूमी

Mahesh Konadkar Assault Case: मांद्रेचे माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर जमीन विक्री व्यवहारातून हल्ला केल्याची कबुली हल्लेखोरांनी दिल्याची माहिती आज पोलिसांनी दिली. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न असफल ठरला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Mahesh Konadkar Mandrem Assault Case

मोरजी: मांद्रेचे माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर जमीन विक्री व्यवहारातून हल्ला केल्याची कबुली हल्लेखोरांनी दिल्याची माहिती आज पोलिसांनी दिली. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न असफल ठरला आहे.

ज्या सहा संशयितांना पोलिसांनी पकडले आहे, त्यातील तिघेजण जमीन खरेदी-विक्री व्यवहारात गुंतले आहेत. या तिघांनी शिवोली येथील एका जमीन विक्रीचा व्यवहार सुरू केला होता. त्यानंतर महेश कोनाडकर यांनी त्या जमिनीचा विक्री व्यवहार केला.

त्या रागातूनच कोनाडकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला, अशी माहिती मांद्रेचे पोलिस निरीक्षक नारायण चिमुलकर यांनी दिली. अजूनही अधिक माहिती मिळविण्यासाठी सहाही संशयितांना पोलिस कोठडी बजावल्यामुळे पोलिस तपासानंतरच या प्रकरणावर अधिक प्रकाशझोत पडेल, असे चिमुलकर म्हणाले.

संशयितांनी पाेलिसांना सांगितले की, आम्ही शिवोली येथील एक जागेचा व्यवहार केला होता. त्याच जागेचा व्यवहार महेश कोनाडकर हे करत असल्यामुळे आम्हाला त्यांचा राग होता. म्हणून आम्ही त्यांच्यावर हल्ला केला. कोनाडकर यांच्यावर चार डिसेंबर रोजी खुनी हल्ला झाला होता. ‘तुका मायकल लोबो जाय?’ असे विचारत बुरखाधारी हल्लेखोरांनी त्यांना मारहाण केली होती.

संशयितांची जामिनावर सुटका

खुनी हल्ला प्रकरणातील सहा संशयितांना पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले असता, त्यांना पोलिस कोठडी देण्यास नकार दिला आणि त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर झाली. त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Morjim Turtle Conservation: पर्रीकरांचे स्वप्न वन खात्याच्या दुर्लक्षामुळे अधांतरी! तेमवाडा कासव संवर्धन केंद्राची दुरवस्था; निसर्गप्रेमींमध्ये संताप

Goa Crime: बाजारात पार्क केलेल्या टेम्पोत आढळला 55 वर्षीय महिलेचा मृतदेह; खुनाचा संशय, पोलिस, फॉरेन्सिक पथक दाखल

Canacona Beach: पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे! नोंदणी नसलेले वॉटर स्पोर्ट्स अन् डॉल्फिन राईड्सचा काणकोणात हैदोस; माफीयांचे वाढले वर्चस्व

Goa Today Live Updates: घर रिकामे करण्याच्या नोटीसची गोवा मानवाधिकार आयोगाकडून दखल; सुकूर पंचायतीच्या सचिवांना समन्स

AFC Champions League 2: एफसी गोवाचा कडू शेवट! 2025 चे मैदान पराभवाने गाजले; आता भारतीय फुटबॉलचे भविष्यही अधांतरी

SCROLL FOR NEXT