Accidental death dainik gomantak
गोवा

Canacona Murder Case : अंकीताच्या अपघाती मृत्यूची पोलिसांकडून चौकशी सुरू

'तिचा' व्हिसेरा जतन करून पुढील तपासासाठी हैद्राबाद येथे फॉरेन्सिक लॅबला पाठविला जाणार

दैनिक गोमन्तक

Canacona Murder Case : तामने- लोलये येथील विवाहित अंकीता प्रकाश पोळजी हिच्या अपघाती मृत्यूची पोलिसांकडून चौकशी सुरू झाली आहे.आज काणकोण पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना पोलिस स्टेशनमध्ये बोलावून चौकशी केली. तिचा पती प्रकाश इंग्लंडमध्ये काम करत असून तो आज गोव्यात येण्याची शक्यता होती. मात्र तो आज पोहचू शकला नसल्याने उद्या येण्याची शक्यता आहे. त्यानंतर वैद्यकीय तपासणी केलेला अंकिताचा मृतदेह अंतीम संस्कारासाठी कोणाकडे द्यायचे ते ठरणार असल्याचे काणकोणचे उपजिल्हाधिकारी उदय प्रभू देसाई यांनी सांगितले.

तर सात वर्षांपूर्वी विवाह झालेल्या विवाहीतेचा अपघाती मृत्यृ झाल्यास तिच्या मृत्यूची चौकशी करण्याचा अधिकार उपजिल्हाधिकाऱ्याना आहे. काणकोणचे उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) उदय प्रभू देसाई यांच्यामार्फत तिच्या अपघाती मृत्यूची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. वैद्यकीय तपासणीत तिच्या मृतदेहावर काही जखमा व ओरबडे सापडले आहेत. त्यामुळे तिच्या मृत्यू प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

वैद्यकीय तपासणीनंतर तिचा व्हिसेरा जतन करून पुढील तपासासाठी तो हैद्राबाद येथे फॉरेन्सिक प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार असल्याचे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या काणकोण पोलिस (Police) स्थानकाच्या महिला पोलिस उपनिरीक्षक रिफा बार्रेटो यांनी सांगितले. तिचे लग्न होऊन तीन वर्षाचा कालावधी लोटला आहे. विवाहानंतर सात वर्षांपूर्वी विवाहीतेचा मृत्यू झाल्यास तिच्या मृत्यूची सखोल चौकशी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे या प्रकरणाचा आता काणकोणचे उपजिल्हाधिकारी उदय प्रभू देसाई यांच्या मार्फत चौकशी (Inquiry) होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Divjotsav 2025: 25-30 वर्षांपूर्वी गोव्यात चिकण मातीचेच दिवे दिसायचे, पितळीच्या दिवजांची वाढती संख्या; बदलता दिवजोत्सव

Viral Video: हातात बेड्या, शेजारी पोलिस तरीही बेभान होऊन नाचला; मित्राच्या लग्नासाठी जेलमधून आला सरदार भावड्या

Cash For Job: ‘कॅश फॉर जॉब’मध्ये शोषितांचे काय चुकले?

Child Abuse Awareness: गोव्यात एका वर्षात 202 बालकांवर अत्याचार; दुष्कृत्यांविरुद्ध लढण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याची गरज

Konkani Drama Competition 2025: कोकणी नाट्यस्पर्धेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात ‘भोगपर्व’ प्रथम, जाणून घ्या संपूर्ण निकाल..

SCROLL FOR NEXT