valpoi Traffic Congestion Gomantak DIgital Team
गोवा

Valpoi Traffic Congestion : वाहतूक कोंडी, पार्किंग समस्याबाबत आदेश कागदावरच!

वाळपईत समस्या : बेशिस्त पार्किंगमुळे पादचारी, वाहनचालकांना डोकेदुखी

पद्माकर केळकर

Valpoi Traffic Congestion : वाळपई शहरात वाहतूक कोंडी, पार्किंग समस्या दिवसेंदिवस जटीलच बनत चालली आहे. गुरुवारी (ता.३०) सायंकाळी वाहतूक कोंडीत कदंब बस, खासगी प्रवासी बस, दुचाकी, चारचाकी गाड्या अवरलेडी हायस्कूलसमोरील रस्त्यावर अडकून होत्या. वाळपई नगरपालिकेतर्फे पार्किंगची समस्या निवारण्यासाठी बैठका वारंवार घेतलेल्या आहेत. बैठकीत चर्चाही केली जाते. कागदावर आराखडा तयार केला जातो; पण प्रत्यक्षात वरील समस्या सुटल्या काय? हा सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे.

पालिकेने पुढाकार घेतल्यानंतर मुख्य रस्ता वाळपई न्यायालय ते पोलिस स्थानकापर्यंत नो-पार्किंग झोन करण्यात आलेला आहे. तसा आदेशही संबंधित विभागाने काढलेला होता. वरील नो-पार्किंग झोन केलेल्या जागेत मुख्य रस्ता येतो. त्यामुळे नो पार्किंग कागदावर केले खरे; पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही.

आजही मुख्य रस्त्यालगत प्रचंड प्रमाणात वाहने ठेवलेली दिसून येत आहेत. मुख्यत्वेकरून अवर लेडी शाळेसमोर मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहने ठेवली जातात. पालिकेच्या प्रशासकीय इमारतीसमोरही वाहने ठेवली जातात. त्यामुळे वरील आदेश केवळ कागदावरच राहिलेला आहे.

वाहतूक पोलिसांमुळे नियंत्रण

सध्या शाळेच्या ठिकाणी वाहतूक पोलिस ठेवलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थांना सुरक्षित रस्ता ओलांडता येतो आहे. शाळेच्या ठिकाणी चालकांसाठी सूचना फलकही लावलेले आहेत. त्याची चांगली अंमलबजावणी करण्यात आली आहे. पण पार्किंगची समस्या जटील बनलेली आहे.

तर योग्य जागा दाखवा!

पोलिस स्थानकापर्यंत नो-पार्किंगचा आदेश काढल्यानंतरही त्या जागेत वाहने ठेवली जात आहेत. पण महत्त्वाचे म्हणजे संबंधितांनी कारवाईचा बडगा उगारला तर वाहने ठेवायची तरी कुठे? हा ज्वलंत प्रश्न बनलेला आहे. शासनाने पार्किंगसाठी जागा दाखवावी, असा सूर नागरिकांनी लावला आहे.

रस्त्यालगत वाहने नको

वाळपईत नोकरीसाठी येणारे लोक सकाळी रस्त्यालगत दोन्ही बाजूंनी दुचाकी ठेवून जातात. त्या रात्रीपर्यंत तशाच असतात. त्यामुळे रस्त्यामधून वाहने नेताना त्रासदायक बनते. अवरलेडी, फातिमा कॉन्व्हेंट, नॅशनल हायस्कूल, युनिटी हायस्कूल या ठिकाणी रस्त्यालगत वाहने ठेवली जातात. त्यामुळे समस्या उद्‌भवते.

पे-पार्किंगचा उपाय

बेशिस्त वाहने पार्किंगवर पे-पार्किंग हा चांगला उपाय ठरणार आहे. पे-पार्किंगद्वारे वाहने पार्क केल्यास त्यातून महसूलही प्राप्त होईल. तसेच शाळा-महाविद्यालयांतील मुले शाळेत दुचाकी घेऊन येतात. त्यावेळी भरधाव वेगाने वाहन चालविले जाते. याबाबत पालकांनी पुढाकार घेऊन मुलांना विनापरवाना वाहने चालविण्यास प्रतिबंध केला पाहिजे. शाळेजवळील रस्त्यावर गाड्या ठेवल्या जातात. त्यावर आळा घातला पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kurdi: 1882 साली सोमेश्वराची घटना पोर्तुगीज दप्तरात नोंद आहे! साळावली धरणाच्या जलाशयाखाली बुडालेले 'कुर्डी' गाव

Bengaluru Airport Bomb Threat: "माझ्याकडे दोन बॉम्ब आहेत", बंगळुरु विमानतळावर हायव्होल्टेज ड्रामा; इंडिगो प्रवाशाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Chimbel Protest: चिंबलवासीयांचे महाआंदोलन! शेकडो ग्रामस्थ पोचले जुने गोवेत; अधिसूचना येईपर्यंत उपोषणाचा इशारा Video

Air Force Base Attack: विमानतळावर गोळीबार अन् स्फोटांचा आवाज! एअर बेसला दहशतवाद्यांनी बनवलं निशाणा; 20 ठार, 11 जणांना बेड्या VIDEO

Social Media Ban Goa: सोशल मीडिया वापरावर सरसकट बंदी अयोग्य! तवडकरांचे प्रतिपादन; अभ्यासावर मर्यादा येण्याची शक्यता व्यक्त

SCROLL FOR NEXT