Polem Toll Liquor Trafficing Dainik Gomantak
गोवा

Polem Checkpost Liquor Smuggling: पिझ्झा डिलिव्हरी, बनावट सरकारी वाहनातून मद्यतस्करी! पोळे चेकनाक्यावर गैरप्रकार; कारवाईची मागणी

Goa Checkpost Liquor Smuggling: पोळे-काणकोण येथील चेकनाक्यावर वेगवेगळ्या विभागांची सहा कार्यालये असूनही येथून खुलेआम बेकायदेशीररित्या दारूची वाहतूक केली जाते.

गोमन्तक डिजिटल टीम

आगोंद: पोळे-काणकोण येथील चेकनाक्यावर वेगवेगळ्या विभागांची सहा कार्यालये असूनही येथून खुलेआम बेकायदेशीररित्या दारूची वाहतूक केली जाते. या चेक पोस्टवर बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. यासंदर्भात त्वरित चौकशी करून संंबंधितांवर कारवाई करण्याची मागणी गावडोंगरीचे सरपंच धिल्लन देसाई यांनी केली आहे.

या चेक पोस्टवर पोलिस, अबकारी, वन खाते, आरटीओ, पशुसंवर्धन, अन्न व औषध प्रशासन तसेच अन्य संबंधित कार्यालयांचे कर्मचारी तपासणीच्या कामासाठी नेमले आहेत. परंतु पोळे येथील स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार येथून बेकायदेशीर दारू, वाळू इत्यादींची खुलेआम तस्करी केली जाते. याविरोधात यापूर्वीही काणकोण तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित रहिवासी आणि ज्येष्ठ नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत.

काणकोण येथे पाळोळे आणि पोळे चेकपोस्टचा समावेश आहे. खुलेआम तस्करी होत असेल तर मग या चेकपोस्टचा उपयोग काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. २०२४ आणि २०२५ साली गोवा आणि शेजारील राज्यांमध्ये उदा. कर्नाटक आणि महाराष्ट्रात मद्य तस्करीच्या अनेक कारवाया उघडकीस आल्या आहेत. ज्यामुळे या समस्येचे व्यापक स्वरूप दिसून येते.

तस्करीसाठी विविध क्लृप्त्या

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोळे चेकनाक्यावर दारू तस्करीसाठी विविध क्लृप्त्या वापरल्या जातात. उदा. पिझ्झा डिलिव्हरीच्या कंटेनरमधून मद्याची वाहतूक करणे, बनावट सरकारी वाहने वापरणे किंवा वनक्षेत्र आणि कोकण रेल्वे बोगद्यासह अन्य निर्जन मार्गांनी मद्याची वाहतूक करण्यासारखे मार्ग अवलंबले जातात.

राजकीय हस्तक्षेपाचा आरोप

राज्यातील विरोधी नेते आणि नागरिकांनीही आरोप केले आहेत, की हे चेकपोस्ट पूर्णत: प्रभावहीन आहेत. काही वाहने तपासणीविनाच सोडतात. विशेषतः रात्रीच्या वेळी काणकोण पोलिसांद्वारे व्यवस्थापित केलेले गेट अशा वाहनांना जाऊ देण्यासाठी उघडे ठेवण्यात येते. तसेच तस्करीच्या कारवायांना राजकीय नेत्यांकडून संरक्षण दिले जाते. त्यामुळे राज्याच्या महसुलाचे मोठे नुकसान होते, असे गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.

सीमावर्ती भागात खासकरून कर्नाटकात मद्य व इतर वस्तूंच्या तस्करीसाठी काणकोणमधील चेकनाके हे एक प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. पोळे चेकनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे चालत नाहीत, ही दुर्दैवी गोष्ट आहे.
महादेव गावकर, माजी सरपंच, खोतिगाव.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol: '..गावकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही'! आरोलकरांचे प्रतिपादन; हरमलच्या जमीन रूपांतरणास कडाडून विरोध

Fake Liquor Racket: उसगाव बनावट दारू प्रकरण! दीड कोटींचा मुद्देमाल जप्त; अजून 3 जणांना अटक

अमेरिकेतून 'देसी गर्ल' 7 वर्षानंतर गोव्यात, मालक स्वतः हातात प्लेट घेऊन आला स्वागताला; Video Viral

Ravi Naik : ‘असुनी नाथ मी अनाथ'! अजूनही फोंडावासीयांना ’पात्रांव’ आमच्यात नाहीत, हे खरेच वाटत नाही..

Cylinder Gas Theft: धोकादायक! उघड्यावर LPG सिलिंडरमधून गॅसचोरी; एजन्सी व्यवस्थापकासह 3 जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT