Pod Hotel at Margao Railway Station  Dainik Gomantak
गोवा

Margao Railway Station वर नवीन वर्षापासून पॉड हॉटेल; कोकण रेल्वेचा उपक्रम

प्रवाशांना होणार फायदा

Akshay Nirmale

Pod Hotel Service at Margao Railway Station: गेल्या काही काळात गोव्यातील सर्वात मोठ्या अशा मडगाव रेल्वेस्टेशन परिसरात नवनवीन सुविधा दिल्या जात आहेत. स्थानकाचाही कायापालट घडवला जाणार आहे.

दरम्यान, नवीन वर्षापासून म्हणजेच पुढच्याच महिन्यापासून आता मडगाव रेल्वे स्टेशनवर पॉड हॉटेल ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पॉड हॉटेलला कॅप्सूल हॉटेल म्हणूनही ओळखले जाते आणि एक अद्वितीय प्रकारची मूलभूत, परवडणारी निवास व्यवस्था याद्वारे प्रवाशांना दिली जाते.

मडगाव रेल्वे स्टेशनच्या इमारतीतच ही सेवा दिली जाणार आहे. प्रत्येक अतिथीसाठी एक कॅप्सूल दिली जाते. मूलत: बेडच्या आकाराचे हे पॉड जे दरवाजा किंवा पडद्याने बंद करता येतात. मुंबई मध्य रेल्वे आपल्या प्रवाशांना अशा प्रकारची पॉड हॉटेल सेवा पुरवते.

याचा फायदा ज्येष्ठ नागरिकांसह ज्यांच्या रेल्वेगाडीला बराच विलंब असणार आहे, त्यांना होऊ शकतो. कमी वेळेत हॉटेल रूम शोधणे बऱ्याचदा प्रवाशांसाठी जिकिरीचे असते. अशावेळी प्रवाशांना या पॉड हॉटेलचा फायदा होऊ शकतो.

मडगाव रेल्वे स्थानकाच्या पहिल्या मजल्यावर जिथे पूर्वी तिकीट आरक्षण कार्यालय होते, तिथे हे पॉड हॉटेल सुरू होईल.

या सेवेसाठी तासाला नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे. प्रवाशांना साह्य करणे हाच यापाठीमागचा हेतू आहे. तथापि, त्यातून कोकण रेल्वेला महसूलही मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT