POCSO Case Dainik Gomantak
गोवा

पॉक्सो प्रकरण; आरोपी डॉक्टरला प्रशिक्षणासाठी रुग्णालयात परतण्याची परवानगी, विशेष न्यायालयाचा सशर्त दिलासा

Dr Vrushabh Doshi POCSO Case: आरोपीवर एका रुग्णाचा विश्वास संपादन करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: पॉक्सो कायद्यांतर्गत दाखल असलेल्या एका विनयभंग प्रकरणातील आरोपी डॉक्टरला, विशेष न्यायालयाने दिलासा देत त्याचे वैद्यकीय प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी त्या हॉस्पिटलमध्ये परतण्याची सशर्त परवानगी दिली आहे. या प्रकरणी डॉ. वृषभ दोषी (वय २९) याला ११ मे २०२५ रोजी अटक करण्यात आली होती आणि ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता.

आरोपीवर एका रुग्णाचा विश्वास संपादन करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. ही घटना घडताना तेथे कोणतीही महिला परिचारिका किंवा कर्मचारी उपस्थित नव्हता. ‘पोश’ कायद्यांतर्गत झालेल्या चौकशीतही आरोप सिद्ध झाल्याचे नमूद करण्यात आले होते.

दरम्यान, जामिनावर असताना त्याला संबंधित रुग्णालयात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती. आरोपीने आपल्या अर्जात नमूद केले होते की, या निर्बंधांमुळे त्याचे ''डीएनबी'' अभ्यासक्रम अर्धवट राहून त्याचे शैक्षणिक करिअर धोक्यात आले आहे. न्यायालयाने म्हटले की, पीडितेची स्थिती पाहता खटला पूर्ण होण्यास बराच कालावधी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT