Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: 2,870 कोटी रुपयांचे 'मोपा'; रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, असा असेल मोदींचा गोवा दौरा

गोव्यात नव्याने उभारण्यात आलेल्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन रविवारी (दि.11) पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे.

Pramod Yadav

PM Modi Visit To Goa: गोव्यात नव्याने उभारण्यात आलेल्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन रविवारी (दि.11) पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये पंतप्रधान मोदी यांनीच या विमानतळाची पायाभरणी केली होती. पायाभूत सुविधांच्या मध्यवर्ती संकल्पनेवर उभारण्यात आलेल्या या विमानतळासाठी सुमारे 2,870 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात या विमानतळावर दर वर्षी 4.4 दशलक्ष प्रवाशांची ये-जा क्षमता असेल, ती टप्प्याटप्प्याने वाढून 33 दशलक्ष होण्याची शक्यता आहे. (PM to visit Goa on 11th December)

अत्याधुनिक आणि सर्वोत्तम तंत्रज्ञान

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mopa Internatinal Airport) सौर उर्जा संयंत्रे, इको फ्रेन्डली इमारती, धावपट्टीवर एलईडी दिवे, पर्जन्य जल संधारण, पुनर्वापर प्रक्रियेची व्यवस्था यासह अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र यांसह अशा इतर अनेक सुविधांचा समावेश आहे.

या विमानतळाच्या उभारणीसाठी त्रिमित मोनोलिथिक प्रीकास्ट इमारत, स्टॅबिलरॉड, रोबोमॅटिक हॉलो प्रीकास्ट भिंती, 5 जी तंत्रज्ञानाशी अनुरूप माहिती तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा अशा सर्वोत्तम दर्जाच्या विशेष तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला आहे.

विमानतळाच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये, जगातील सर्वात मोठ्या विमानांच्या परिचालनाची क्षमता असणारी धावपट्टी, रात्रीच्या वेळी विमाने उभी करून ठेवण्यासाठी विशेष व्यवस्थेसह 14 पार्किंग बेज, सेल्फ-बॅगेज ड्रॉप सुविधा, अत्याधुनिक आणि स्वायत्त हवाई दिशादर्शन सुविधा यासह अनेक सोयी सुविधांचा समावेश आहे.

असा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गोवा दौरा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी मोपा विमानतळावर उतरतील. त्यानंतर ते 9 व्या जागतिक आयुर्वेद संमेलनाच्या समारोपाला उपस्थित राहणार आहेत. याठिकाणी ते उपस्थितांना संबोधित करतील. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते यावेळी तीन राष्ट्रीय आयुष संस्थांचे उद्घाटन देखील होणार आहे. 9 वे जागतिक आयुर्वेद संमेलन आणि आरोग्य एक्स्पो मध्ये जगातील 50 देशांचे 400 हून अधिक प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि आयुर्वेद विषयाशी संबंधित इतर भागधारक सहभागी झाले आहेत. “वन हेल्थ साठी आयुर्वेद” ही या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. त्यानंतर मोपा विमानतळाचे उद्धाटन होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sacorda: सफर गोव्याची! पावसाळ्यात हिरवीगार शाल पांघरणारे, कदंबकालीन शिवमंदिराची भक्ती करणारे 'साकोर्डा'

Iranian Warship Attack: श्रीलंकेच्या किनाऱ्यावर इराणच्या युद्धनौकेवर पाणबुडी हल्ला, ‘IRIS डेना’ समुद्रात बुडाली; 101 कर्मचारी बेपत्ता, 78 जखमी

Milind Soman Goa Swimming: गोव्यात मिलिंद सोमणचं हटके होळी सेलिब्रेशन! खवळलेल्या समुद्रात 15 किमी स्विमिंग; अचाट स्टॅमिना पाहून नेटकरी थक्क VIDEO

T20 World Cup 2026 Semifinal: "हार मानणं आमच्या रक्तात नाही!" सेमीफायनलपूर्वी हॅरी ब्रूकचा भारताला तगडा इशारा; टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्यासाठी ठोकला शड्डू

Mumbai Margao Vande Bharat Express चे डबे वाढणार कधी? प्रवाशांची 20 डब्यांची मागणी; सावंतवाडी येथे थांबा अपेक्षित

SCROLL FOR NEXT