Sanjay Nirupam Dainik Gomantak
गोवा

Sanjay Nirupam: मोदींच्या 56 इंच छातीत ब्लॅक मनी परत आणण्याची, बँक घोटाळेबाजांवर कारवाईची हिंमत नाही!

काँग्रेस नेते संजय निरूपम यांचा आरोप

गोमंतक ऑनलाईन टीम

Sanjay Nirupam On BJP Government: मागील नऊ वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या 56 इंच छातीत देश सुरक्षित करण्याची, काळा पैसा परत आणण्याची, बँक घोटाळेबाजांवर कारवाई करण्याची हिंमत दिसलेली नाही असे काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी म्हटले आहे.

मोदी सरकार 'अपयशी', 'असंवेदनशील' आणि 'अकार्यक्षम' असल्याचे मागील नऊ वर्षात सिद्ध झाले आहे. महागाई, बेरोजगारी आणि देशाच्या भूमीचे रक्षण करण्यात अपयश का आले, असा सवाल त्यांनी केला.

पणजी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार अॅड. कास फॅरेरा आदी यावेळी उपस्थित होते.

संजय निरुपम म्हणाले की, एनडीए सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत असताना, त्यांना नऊ प्रश्न विचारणे त्यांचे कर्तव्य आहे, ज्यात वाढत्या किंमती, बेरोजगारी, चीन मुद्द्यावर राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक सलोखा, सामाजिक न्याय, लोकशाही, कल्याणकारी योजना आणि कोविड-19 गैरव्यवस्थापनाचा समावेश आहे.

“नरेंद्र मोदी सरकारच्या गेल्या नऊ वर्षात महागाई आणि बेरोजगारी कमीच होत नाही आणि आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. या सरकारने केवळ भांडवलदारांच्या हिताचे काम केले. श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब का झाले?, असा सवाल माजी खासदार संजय निरुपम यांनी केला.

‘‘हे सरकार गरीबांसाठी नाही तर श्रीमंतांसाठी आहे. आर्थिक बाजू सांभाळण्यास ते पूर्णपणे अपयशी ठरले आहे. भाजपने केवळ भांडवलदारांना मदत केली आहे. नऊ वर्षांपूर्वी एलपीजीची किंमत 410 रुपये होती, आता ती 1100 रुपये आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दरही दुप्पट झाले आहेत. खाद्यतेल आणि इतर अन्नधान्याच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. काँग्रेसने आपल्या राजवटीत दारिद्र्यरेषेखालील 26 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेवर नेले होते, मात्र अलीकडच्या काळात 28 कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली गेले आहेत.

ते म्हणाले की, भाजप सरकार रोजगार निर्माण करण्यात अपयशी ठरले, ज्याचे त्यांनी आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यातही ते अपयशी ठरले. शेतकरी पिके घेऊन दिवसाला फक्त 27 रुपये कमावतात,’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले की, सरकार अनुदान आणि इतर मदत देण्यास अपयशी ठरल्याने शेतीच्या कामातील निविष्ठा खर्च दररोज वाढत आहे. ‘‘या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफ केले का, असा सवाल त्यांनी केला.

मोदी सरकार सर्वात भ्रष्ट सरकार आहे आणि उद्योगपती गौतम अदानी यांना त्यांचे उत्पन्न वाढविण्यात मदत केली आहे आणि गरीब लोकांना मदत करण्यात अपयशी ठरले आहे. काळा पैसा परत आणण्याचे विसरा, 68 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेऊन पळून गेलेल्या फरारांना मोदी सरकारने संरक्षण दिले आहे.

मोदींची 56 इंच छाती असताना थकबाकीदार कसे पळू शकतात. पीएम केअर फंडाचे ऑडिट होत नाही. हा पैसा कुठे जातो आणि भाजप पक्षाच्या प्रचारासाठी हा निधी वापरतो की नाही हे आम्हाला माहीत नाही,” असे ते म्हणाले.

निरुपम म्हणाले की, भाजप सरकार देशाच्या भूमीचे रक्षण करण्यात अपयशी ठरले आहे कारण अंदाजे 1500 किलोमीटर भारताची जमीन चीनने बळकावली आहे. ‘‘मोदींनी या विषयावर बोलावे. या प्रश्नावर ते असंवेदनशील का आहे? ते बोलायला का घाबरतात.

राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर तडजोड झाली आहे. गेल्या नऊ वर्षांत एससी, एसटी अल्पसंख्याक आणि महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. मात्र त्याचे सोयर सुतक भाजपला नाही. भाजपकडून लोकशाहीची हत्या केली जात आहे. ते इतर पक्षांच्या आमदारांना धमक्या देऊन आणि केंद्रीय एजन्सींचा वापर करून त्यांच्यात सामील होण्यास भाग पाडतात.

कोविड महामारीचा सामना करण्यात भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले. त्यावेळी चुकीचे व्यवस्थापन केले गेले. त्यावर उपाय म्हणून ‘थाली बजाओ’ सारखे अवैज्ञानिक मार्ग वापरले गेले.

सुमारे 4 कोटी स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यांमध्ये जाण्यास भाग पाडले गेले आणि लसींवर पैसे लुटले गेले. लोकांनी या सर्व गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला घरी पाठवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: खासदार विरियातो, प्रदेशाध्यक्ष पाटकर पोलिसांच्या ताब्यात; काँग्रेसचे कॅश फॉर जॉब विरोधात आंदोलन

IFFI Goa 2024: "आलीयाच्या सुरक्षेसाठी मी त्याला हाकललं होतं" काही तासांतच 'ते' विधान फिरवल्याने इम्तियाज अली वादाच्या भोवऱ्यात

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

National Cashew Day: गोव्यात काजूचे पीक घेणे का बनत आहे कठीण? कारणे जाणून घ्या..

Goa Bench: निवृत्त कर्मचारी सेवा नियमांत बदल; निवृत्तीवेतनाची थकबाकी देण्यास एक वर्षाची मुदत

SCROLL FOR NEXT