37 th National Games 2023 Goa Dainik Gomantak
गोवा

37th National Games 2023 Goa: गोव्याला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची संधी एकदाच; 26 ऑक्टोबरला उद्‍घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती; मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही

दैनिक गोमन्तक

37th National Games 2023 Goa: तब्बल १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गोव्यात होणाऱ्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्‍घाटन २६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे निश्चित झाले आहे.

मात्र, त्यासाठी सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारला पेलावे लागणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २० ऑक्टोबरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याची ग्वाही शुक्रवारी दिली.

त्याचवेळी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे यजमानपद राज्याला फक्त एकदाच मिळणार आहे, हे सुद्धा ते जाणून आहेत. क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते.

यावेळी जीटीसीसी प्रमुख अमिताभ शर्मा आणि क्रीडा सचिव स्वेतिका सचन उपस्थित होत्या.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, की ‘‘गोव्याला ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद मिळालेय, ही राज्यासाठी खूप मोठी भाग्याची बाब आहे. पुन्हा अशी संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी स्पर्धा पाहण्याचा अनुभव घ्यावा. पालक आणि शिक्षकांनी मुलांना प्रोत्साहित करावे.’’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर स्पर्धेचा शुभारंभ होईल.

तपभराची प्रतीक्षा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, ‘‘स्पर्धेचे यजमानपद मिळण्यासाठी तब्बल १२ वर्षे वाट पाहावी लागली. आता क्रीडा स्पर्धेची सज्जता झाली आहे. स्पर्धेच्या उदघाटनापूर्वी काही दिवस अगोदर काही खेळांतील सामने होतील.

उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून त्यांचे मी राज्यातील या भव्यदिव्य स्पर्धेसाठी स्वागत करतो. स्पर्धेत प्रथमच सर्वाधिक ४३ खेळांचा समावेश असून देशातील पारंपरिक ८ खेळांचा, तसेच ५ जलक्रीडांचाही समावेश करण्यात आला आहे. स्पर्धेचा समारोप ९ नोव्हेंबरला होईल.

क्रीडापटूंची विक्रमी उपस्थिती

फातोर्डा येथील स्टेडियमची क्षमता १२ हजार इतकी आहे. उदघाटन समारंभ सर्वांना खुला असेल आणि राज्यातील १० ठिकाणी या कार्यक्रमाचे प्रक्षेपण केले जाईल.

आठ दिवस अगोदर सज्जता

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, ‘‘स्पर्धेची सर्व तयारी २० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केली जाईल. गोव्यात सध्या ज्या क्रीडा साधनसुविधा उपलब्ध आहेत, त्यांचा आम्ही पुनर्वापर करत आहोत. काही सुविधा नव्याने तयार करण्यात आल्या आहेत. यापूर्वी आम्ही स्पर्धेचे बोधचिन्ह, शुभंकर (मोगा), स्पर्धा गीत, मशाल अनावरण आदी कार्यक्रमांद्वारे वातावरण निर्मिती केली आहे.’’

३७ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा

१०,००० हून जास्त क्रीडापटू

५००० हून अधिक महिला खेळाडू

४७४० तांत्रिक अधिकारी

४३ सर्वाधिक खेळ

७५० क्रीडा प्रकार

२८ स्पर्धा केंद्रे

३६ खेळांत गोवा सहभागी

"आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील पर्यटन, संस्कृती आणि खेळ यांची सांगड घालत आहोत. आम्हाला पूर्ण आत्मविश्वास असून यशस्वी राष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज आहोत. पावसामुळे ३० सप्टेंबरची मुदत पाळण्यास शक्य झाले नाही, पण आता तयारी पूर्ण होत आली आहे.’’

- गोविंद गावडे, क्रीडामंत्री.

"गोव्याची स्पर्धेची तयारी आणि साधनसुविधा उपलब्धी याबाबत ‘आयओए’ पूर्ण समाधानी आहे. ही क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पडेल, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आमचे आयोजनात सर्वतोपरी सहकार्य गोव्याला लाभत आहे. एकंदरित तयारी योग्य दिशेने असून नियोजित वेळेत पूर्ण होईल."

- अमिताभ शर्मा, सदस्य, आयओए.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jemimah Rodrigues: टीम इंडियाची धाकड 'रॉकस्टार'! जेमिमाच्या 'आशाएं' गाण्यावर नेटकरी झाले फिदा; दिग्गजांच्या उपस्थिती गायलं काळजाला भिडणारं गाणं WATCH VIDEO

गोवा मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय! मडगाव रवींद्र भवनचा होणार कायापालट; व्हॅट कायद्यात सुधारणा अन् 'जीआयएम'ला विद्यापीठाचा दर्जा

कोलवाळमध्ये टॅक्सी चालकांची गर्दी! मोपा विमानतळावरील 'वसुली' विरोधात आंदोलन; 210 रुपये शुल्कामुळे संतापाची लाट

Dhirio in Colva: सुरावलीत पुन्हा धीरियोचा थरार, पोलिसांकडून FIR दाखल; Viral Video वरुन चर्चा..

Savoi Verem: झुळझुळ वाहणारे शीतल झरे, बागायतींनी नटलेला परिसर; मांडवीच्या कडेवर वसलेला गाव 'सावईवेरे'

SCROLL FOR NEXT