PM Narendra Modi Goa visit Dainik Gomantak
गोवा

PM Narendra Modi Goa visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गोव्यात; श्रीरामांच्या मूर्तीचं करणार अनावरण, लोटणार भक्तांचा 'पूर'; भव्य कार्यक्रमांचे आयोजन

PM Narendra Modi In Goa: श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठाचा ५५० वा वर्धापनदिन आणि श्री रामांच्या ७७ फूटी भव्य मूर्तीच्या अनावरण सोहळ्यानिमित्त तयारी पूर्ण झाली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी : श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठाचा ५५० वा वर्धापनदिन आणि श्री रामांच्या ७७ फूटी भव्य मूर्तीच्या अनावरण सोहळ्यानिमित्त तयारी पूर्ण झाली असून २७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर दरम्यान भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदी हे शुक्रवारी (ता.२८) श्रीरामांच्या मूर्तीच्या अनावरणासाठी दुपारी ३.४५ वा. गोव्यात दाखल होतील, असे मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी सांगितले. धेंपो हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी बांधकाममंत्री दिगंबर कामत, उद्योगपती शिवानंद साळगावकर, अनिल पै व इतर उपस्थित होते. मंत्री कामत म्हणाले की, श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाला ५५० वर्षे पूर्ण होत आहेत. हा गोमंतकीयांसाठी अतिशय अभिमानाचा क्षण आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी, साधनसुविधा पुरविण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मठात उपस्थिती लावणार आहेत त्यामुळे अध्यात्मिकदृष्ट्या हा महत्त्वाचा क्षण असून सर्व गोमंतकीयांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी सांगितले. दहा दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमांसाठी रोज दहा हजार भाविक येतील, असेही कामत यांनी सांगितले.

कार्यक्रमाची वैशिष्ट्ये

१. २७ नोव्हेंबर रोजी हृषिकेश तीर्थ पिठाचे श्रीमद् विद्याधीश तीर्थ स्वामी आणि पट्ट शिष्य श्रीमद् विद्याराजेश्वर तीर्थ स्वामीजी उपस्थित राहणार आहेत.

२. ४ डिसेंबर रोजी श्री संस्थान गौडपादाचार्य कवळे मठाधिश श्रीमद शिवानंद सरस्वती स्वामी, श्री चित्रापूर मठाधीश श्रीमद सद्ज्योत शंकाराश्रम स्वामी येणार आहेत.

३. प्रख्यात गायक अनुप जलोटा, शंकर महादेवन, निलाद्री कुमार, मैथिली ठाकूर आणि महेश काळे यांचे कार्यक्रम होणार आहेत.

४. दरदिवशी ५५ हवन होणार आहेत असे एकूण ५५० हवन होणार असून ५ डिसेंबर रोजी महापूर्णाहूती कार्यक्रम होणार आहेत.

५.दरदिवशी सुमारे ७ ते १० हजार नागरिक मठाला भेट देतील.

६. दहा ते बारा हजार भाविकांना बसता यावे ‘जर्मन टॅक’ उभारण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारची नागरिकांना असुविधा होऊ नये याची काळजी घेण्यात आली आहे.

७. कार्यक्रम स्थळी येणाऱ्या सर्वांची नोंदणी करण्यात येणार आहे.

पंतप्रधानांचा असा असेल कार्यक्रम...

श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ पर्तगाळ येथे आशिया खंडातील सर्वात मोठ्या ७७ फुट उंचीच्या मर्यादा पुरूषोत्तम श्री रामांच्या मूर्तीचे अनावरणासाठी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात येणार आहे. त्यांचा कार्यक्रम असा...

१) दुपारी ३.४५ वा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हॅलिकॉप्टरमधून थेट श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठात दाखल होतील.

२) दुपारी ४ वा. श्रीराम प्रतिमा आणि थ्रीडी प्रोजेक्शन मॅपिग प्रकल्पाचे अनावरण मोदींच्या हस्ते होईल.

३) अनावरणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी श्री रामदेव, देव श्री वीर विठ्ठल, देव श्री वासुदेव, देव श्री व्यंकटेश, श्री वेदव्यास, श्री लक्ष्मीनारायण व इतर देवतांचे दर्शन घेतील.

४) देवदर्शनानंतर मोदी उपस्थितांना संबोधित करतील.

५) कार्यक्रमादरम्यान मठाच्या ५५० व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष पोस्ट कार्ड आणि मठाचे बोधचिन्ह असलेले नाण्याचे लोकार्पण करण्यात येईल.

६) ५ वाजता पंतप्रधान दिल्लीला प्रयाण करतील.

‘रामायण थीम पार्क’

मठ परिसरात पुढील दोन महिन्यांत रामायणावर आधारित थीम पार्क तसेच १० हजार चौरस मीटर जागेत म्युझियम आणि लाईट साऊंड शो आदी सुरू केले जाणार आहेत. हा मठ गोव्यातील अध्यात्मिक पर्यटनाचे केंद्र बनवा, अशी यामागील भूमिका असल्याचे दिगंबर कामत यांनी सांगितले.

अवजड वाहनांसाठी उद्या रस्ता बंद

पर्तगाळ जीवोत्तम मठ सोहळ्यासाठी अतिमहनीय व्यक्तींच्या भेटीच्या वेळी काणकोण ते मडगाव मार्ग अवजड वाहनांसाठी बंद असेल. दीड वाजेपर्यंत भाविकांनी पर्तगाळ मठ प्रवेशद्वाराजवळ पोहोचावे तेथून पुढे जाण्यासाठी शटल सर्व्हिस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, काणकोण परिसरातील शाळांना शुक्रवारी ता. २८ रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'शांत राहा! आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात', मनोज परब यांचा दावा, कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन; Watch Video

DLF Housing Project: 'दाबोळी टेकडीवरील एकाही झाडाला हात लावू नका', कोर्टाची 'डीएलएफ'ला ताकीद

Goa Politics: खरी कुजबुज; काँग्रेस 'झेडपी' निवडणुकीबाबत गंभीर आहे?

Rohit Sharma: 'बूम बूम' आफ्रिदीचा विक्रम विक्रम उद्ध्वस्त होणार? 'हिटमॅन' रोहित शर्मा बनणार 'सिक्सर किंग', फक्त 'इतक्या' षटकारांची गरज

Goa Live News: पूजा नाईक 'नोकरीसाठी पैसे' प्रकरण: चौकशी अजूनही सुरू; आतापर्यंत आरोप सिद्ध झाले नाहीत: पोलीस महासंचालक

SCROLL FOR NEXT