पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 ऑगस्ट रोजी संध्याकाळी महाराष्ट्र आणि गोव्यातील NDA च्या खासदारांची भेट घेणार आहेत. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ- एनडीए) च्या खासदारांना तसेच महाराष्ट्रातील राज्यसभेच्या खासदारांनाही या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री भारती पवार आणि कपिल पाटील हे या कार्यक्रमाचे यजमान असणार आहेत.
(PM Modi Will Meet NDA Member of Parliament from Goa and Maharashtra)
गोव्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. आगामी निवडणुकीत एक-एक जागाही महत्वाची असणार आहे. त्यामुळे भाजप तयारीला लागला आहे. गोव्यात सध्या दोन पैकी खासदार भाजपचा आहे. उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक हे भाजपचे खासदार आहे ते केंद्रात राज्य मंत्रीही आहेत.
तर दक्षिण गोव्यात काँग्रेसचे फ्रान्सिस्को सार्दिन हे खासदार म्हणून निवडून आले होते. 2014 मध्ये दक्षिण गोव्याची जागाही भाजपकडे होती. ती जागा परत जिंकण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी गोव्यातील फोंडा येथे एक सभाही घेतली होती.
याशिवाय गोव्यात राज्यसभेची एक जागा असून त्या जागेवर नुकतेच भाजपचे गोव्याचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे बिनविरोध निवडून आले आहेत.
महाराष्ट्रात 48 मतदारसंघ आहेत. त्यामुळे भाजपसाठी महाराष्ट्र हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे. या बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनाही खास आमंत्रित केले आहे.
बैठकीला भाजपसह एनडीएतील घटक पक्षांच्या खासदारांना तसेच महाराष्ट्रातील राज्यसभेच्या खासदारांनाही आमंत्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या सर्व खासदारांना 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी करण्यासाठी, लोकसभा निवडणुकीत जागा जिंकण्यासाठी आणि प्रत्येक जागेबाबत माहिती जाणून घेण्यासाठी आमंत्रित केले आहे.
या बैठकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांचा समावेश असेल. या बैठकीत पंतप्रधान मोदी एनडीएच्या खासदारांकडून महाराष्ट्र आणि गोव्यातील लोकसभेच्या सर्व जागांचा फीडबॅक जाणून घेणार आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.