Vijai sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai: मडगावात शिरायलाच जागा नाही; मोदी काय मोडकळीस आलेल्या इमारती पाहणार?

Vijai Sardesai: मोदींच्या दौऱ्यावरून टीका टिपण्णी सुरु झाली असून गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर शरसंधान साधले आहे.

Ganeshprasad Gogate

Goa forward Vijay Sardesai criticizes former Chief Minister Digambar Kamat:

भारतीय ऊर्जा सप्ताहाच्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 फेब्रुवारी रोजी गोव्यात येणार असून गोव्यातील भाजप नेत्यांसह कार्यकर्ते जोमाने तयारीला लागले आहेत.

विशेष म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात होत असलेला मोदींचा हा दौरा म्हणजे भाजपसाठी एक प्रकारचे प्रचार कार्यक्रम असणार आहे. दौऱ्याच्या निमित्ताने भाजप आपल्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार असल्याचे बोलले जातेय.

मात्र आता या दौऱ्यावरून टीका टिपण्णी सुरु झाली असून गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर शरसंधान साधले आहे.

दिगंबर कामतांना वाटतं की पंतप्रधानांची सभा मडगावात व्हावी. पण मडगावात शिरायलाच आता जागाच उरली नसून तिथं जाऊन मोदी कांय मोडकळीस आलेल्या इमारती पाहणार का असा सवाल सरदेसाईंनी व्यक्त केलाय.

मोदींच्या सभेमुळे बसस्टॅंडला तात्पुरते का होईना पण नवे रुप येतेय. अन्यथा इतकी वर्षे मडगावचा बस स्टॅन्ड म्हणजे जनवारांचा गोठा झाला होता.

आता निदान पंतप्रधानांच्या सभेनंतर तरी मडगांव बसस्टॅंडला नवे स्वरुप प्राप्त होवो हीच इच्छा अशा शब्दात त्यांनी दिगंबर कामतांवर शरसंधान साधलंय.

काही दिवसांपूर्वीच इतिहासकार योगेश नागवेकर यांनी मडगावात मोडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरावस्थेबाबत सरकारला चांगलेच सुनावले होते.

ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेली आणि 118 वर्षे जुनी असलेली मडगाव नगरपालिकेची इमारत, कोमुनिडेड इमारत, हॉस्पिसिओ इमारत तसेच मडगाव अर्बन हेल्थ सेंटर सध्या अखेरच्या घटका मोजत असून त्या अस्तित्वासाठी धडपडत असल्याचे नागवेकर यांनी जाहीररीत्या सांगितले होते.

तसेच या वारसा वास्तूंकडे प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याने त्या कोसळण्याच्या मार्गावर असून सरकार सर्व हेरिटेज वास्तू दुरुस्तीबाबत वेळ काढूपणाचे धोरण अवलंबत असल्याचा आरोपही नागवेकर यांनी केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: GMC मध्ये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये वाढ

Goa Recruitment: निवड आयोगाची 'भरती प्रक्रिया' कशी असणार? 2023 मध्येच नियमावली तयार; संगणक आधारित 11 परीक्षा यशस्वी

Santa Cruz: 'सांताक्रूझ' ग्रामसभा अर्ध्या तासात आटोपली! माफीनाम्यावरुन गोंधळ; घरपट्टीच्या प्रश्नाचे भिजत घोंगडे

Dabos Valpoi: दाबोस-वाळपई रस्ता धोकादायक अवस्थेत! खोदकामामुळे मार्गाची दुर्दशा; अपघाताची शक्यता

Navelim Bele Junction: नावेली-बेले जंक्शनवर अनेक त्रुटी, रस्ते सुरक्षा समितीकडून पाहणी; साबांखा अधिकारी मात्र अनुपस्थित

SCROLL FOR NEXT