Rozgar Mela  Dainik Gomantak
गोवा

PM Modi on Rozgar Mela: रोजगार मेळाव्यातील 1,250 युवकांना मिळणार नियुक्तीपत्रे; पंतप्रधान मोदी करणार संबोधित

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली माहिती

दैनिक गोमन्तक डिजिटल

देशातील रोजगाराची पातळी वाढवण्याचा प्रयत्न म्हणून केंद्र सरकार देशाच्या अनेक भागात रोजगार मेळाव्याचे आयोजन करते. या पार्श्वभूमीवर उद्या दिनांक 24 नोव्हेंबर रोजी गोवा राजभवन येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील तसेच 1,250 युवकांना यावेळी नियुक्तीपत्रे सुपुर्त करण्यात येणार आहेत. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

(PM Modi to address Rozgar Mela gathering in Goa on 24 Nov)

मिळालेल्या माहितीनुसार 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता गोवा राजभवन दरबार हॉलमध्ये रोजगार मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करत पोलीस विभाग, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा, नियोजन आणि सांख्यिकी आणि कृषी विभागांमध्ये निवड झालेल्या व्यक्तींना नियुक्तीपत्रे सुपुर्द करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपुर्वीच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील सुमारे 71,000 हून अधिक युवकांना नोकरीची नियुक्ती पत्रे दिली आहेत. यावेळी पंतप्रधांनी गोव्याचा उल्लेख करताना "दुहेरी इंजिन असलेल्या सरकारचा हा दुहेरी फायदा आहे. त्यामुळे तरुणांना नियुक्तीपत्रे देण्याची मोहीम सतत सुरू राहील," असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT