15 Important Points in PM Narendra Modi's Goa Visit ANI
गोवा

PM Modi Goa Visit: सेंट झेवियर, गोव्याचा फूटबॉल आणि पर्यटन; मोदींच्या मडगाव सभेतील महत्वाचे 15 मुद्दे

15 Imp Points in PM Narendra Modi's Goa Visit:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मडगाव येथील सभेला संबोधित करण्यापूर्वी विविध प्रकल्पांचे आभासी पद्धतीने उद्घाटन व लोकार्पण केले.

Pramod Yadav

15 Points in PM Narendra Modi's Madgaon Visit:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोव्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन पार पडले. मडगाव येथील सभेपूर्वी त्यांनी बेतुल येथील भारत उर्जा सप्ताह 2024 चे उद्घाटन करुन देश-विदेशातील प्रतिनिधींना संबोधित केले. तसेच, ONGC च्या एकात्मिक सागर सर्व्हायव्हल ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मडगाव येथील सभेला संबोधित करण्यापूर्वी विविध प्रकल्पांचे आभासी पद्धतीने उद्घाटन व लोकार्पण केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मडगाव सभेतील 15 मुद्दे

1) गोवा सुंदर समुद्रकिनारे आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो. देश -विदेशातील लाखो पर्यटकांसाठी हे फेवरेट हॉलिडे डेस्टिनेशन गोवाच आहे.

2) गोमन्तकीय भूमीने अनेक संत, कलाकारांना आणि प्रसिद्ध व्यक्तीमत्वांना जन्म दिला आहे. यावेळी त्यांनी संत सोहिरोबा आंबिये, आद्य नाटककार कृष्णभट बांधकर, आचार्य धर्मानंद कोसंबी, रघुनाथ माशेलकर तसेच, भारतरत्न लता मंगेशकर यांचाही उल्लेख केला.

3) ऐतिहासिक लोहिया मैदान पुरावा आहे की जेव्हा, देशासाठी काही करायची वेळ येते तेव्हा गोंयकार कोणतीही कसर सोडत नाहीत.

4) यावर्षी सेंट फ्रान्सिस झेवियर ज्यांना गोंयचा साहेब म्हणून ओळखले जाते त्यांचे रेलिक्स प्रदर्शन देखील आयोजित केले जाणार आहे. हे प्रदर्शन आम्हाला शांती आणि सद्भावनेचे शिकवण देते.

5) 1,300 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे झालेले उद्घाटन आणि पायाभरणी गोव्याच्या विकासाला अधिक चालना देतील.

6) देशातील काही पक्षांनी नेहमीच खोटं आणि भीती पसवण्याचे प्रयत्न केले आहेत. पण, गोव्याने अशा पक्षांना प्रखर उत्तर दिले आहे आणि वारंवार दिले आहे.

7) गोवा सरकारने स्वंपूर्ण गोवा मॉडेल विकसित केले असून, त्याची प्रगती लक्षणीय पद्धतीने सुरु आहे. गोव्यात हर घर नळ योजनेची अंमलबजावणी झाली आहे. राज्य 100 टक्के रॉकेल वापरापासून आणि खुल्यावर नैसर्गिक विधीपासून मुक्त आहे.

8) नव्याने सुरु झालेल्या मोपा विमानतळावर देशी, परदेशी उड्डाण सुरु आहेत, नवीन झुआरी पुलाचे उद्घाटन, रेल्वे मार्ग, नवीन शिक्षण संस्था राज्याच्या विकासात भर टाकतील.

9) गोव्यात कोणाला पक्के घर मिळाले नसेल तर त्यांना सांगा मोदींनी त्यांना देखील पक्के घर देण्याचे वचन दिले आहे.

10) यापूर्वीच्या सरकारकडे पर्यटनासाठी कोणतीही योजना नव्हती. गोव्यातील आंतर्गत भागात इको पर्यटनाला चालना दिली जाणार. नव्या प्रकल्पामुळे पर्यटनाचे नवे आकर्षण स्थळे निर्माण होतील.

11) गोव्यात आयोजित G20, SEO आणि आत्ताचा उर्जा सप्ताह यामुळे राज्याची ओळख जागतिक स्तरावर पोहोचत आहे. येत्या वर्षात असे कार्यक्रम आयोजित केले जातील.

12) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने राज्यात निर्माण केलेल्या पायाभूत सुविधांचा राज्यातील खेळाडूंना फायदा होईल. गोवा फुलबॉलपटू ब्रह्मानंद शंखवाळकर यांना आमच्याच सरकारने 'पद्मश्री' देऊन सन्मानित केले.

13) गोव्यात येत्या काळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा आमचा विचार आहे. राज्याला अशा कार्यक्रमांचे केंद्र केले जाईल. यातून येथील स्थानिकांना रोजगार मिळतो.

14) आमचे सरकार गोव्याला शिक्षण हब म्हणून प्रमोट करत आहेत. आज उद्घाटन झालेले नवीन शिक्षण संस्था देशातील विद्यार्थ्यांसाठी नव्या संधी निर्माण करतील.

15) गोव्याच्या विकासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. मोदींच्या गॅरंटीने राज्यातील प्रत्येकाचे आयुष्य सुधारले जाईल असा मला विश्वास आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Goa ZP Reservation: ओबीसी 'ट्रिपल टेस्ट' आणि एससी आरक्षणाचा पेच! झेडपी निवडणुकीच्या भवितव्याचा निर्णय आता न्यायालयाच्या हाती

Mhadei Sanctuary Issue: सीमा ठरवणार, वस्ती हलवणार? म्हादई अभयारण्यात वस्तीला परवानगी नाही, व्याघ्र प्रकल्पाचा पर्याय हुकल्याने गोंधळ; क्लॉड आल्वारिस यांनी स्पष्टच सांगितलं

Goa Robbery Incident: सराफा दुकानाचे शटर फोडले, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, पण पोलिसांच्या 'सतर्कते'मुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला; चावडी बाजारात मध्‍यरात्री थरार!

Horoscope: नवीन संधी येऊ शकते, महत्त्वाच्या निर्णयात संयम हवा! वाचा तुमच्या राशीचे भविष्य

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

SCROLL FOR NEXT